राणेंचा भाजपा प्रवेश कोअर कमिटीचा निर्णय :प्रमोद जठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 03:52 PM2019-09-24T15:52:27+5:302019-09-24T15:56:58+5:30

भारतीय जनता पार्टीत नारायण राणे यांच्या प्रवेशाबाबत राज्य कोअर कमिटीत निर्णय होईल. प्रदेशकडून जो निर्णय घेतला जाईल त्याची अंमलबजावणी करण्याचे काम जिल्हाध्यक्ष म्हणून मी करणार आहे. कोकणात २०२४ पर्यंत शत-प्रतिशत भाजपा करण्याच्यादृष्टीने मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतील.

Rane's BJP admission core committee decision: Pramod Jathar | राणेंचा भाजपा प्रवेश कोअर कमिटीचा निर्णय :प्रमोद जठार

राणेंचा भाजपा प्रवेश कोअर कमिटीचा निर्णय :प्रमोद जठार

Next
ठळक मुद्देराणेंचा भाजपा प्रवेश कोअर कमिटीचा निर्णय :प्रमोद जठारपक्षातील नेत्यांनी विचलित होण्याची गरज नाही

कणकवली : भारतीय जनता पार्टीत नारायण राणे यांच्या प्रवेशाबाबत राज्य कोअर कमिटीत निर्णय होईल. प्रदेशकडून जो निर्णय घेतला जाईल त्याची अंमलबजावणी करण्याचे काम जिल्हाध्यक्ष म्हणून मी करणार आहे. कोकणात २०२४ पर्यंत शत-प्रतिशत भाजपा करण्याच्यादृष्टीने मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतील.

जनसंघाच्या शिकवणीप्रमाणे जसे असतील तसे घ्या आणि त्यांना आपल्याला हवे तसे घडवा या धोरणाप्रमाणे जो कोण भाजपात प्रवेश करेल त्याचे स्वागत असेल. त्यामुळे जिल्ह्यातील नेत्यांनी विचलित होण्याची गरज नाही. सर्वांचा विचार करूनच पक्षहिताचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी स्पष्ट केले.

कणकवली येथील भाजपा संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष शिशिर परूळेकर, जिल्हा सरचिटणीस रवींद्र शेट्ये, डॉ. अरविंद कुडतरकर, संतोष पुजारे, समर्थ राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टीच्या अजेंड्यानुसार जे काम करतील त्यांना सोबत घेऊन पुढील संघटनात्मक बांधणी होणार आहे. कोकणातील परिस्थिती पाहता राज्य कोअर कमिटी पक्ष प्रवेशाचा निर्णय घेईल. राणेंच्या भाजपा प्रवेशाला संदेश पारकर यांनी विरोध केला असून राणेंचा पक्ष प्रवेश झाला तर ते सिंधुदुर्ग भाजपा हायजॅक करतील अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, ह्यसंदेश पारकर यांचे भाजपातील वय काय?ह्ण भाजप हायजॅक करायला हा पक्ष लेचापेचा नाही, असे जठार यांनी सांगितले.

नाणार प्रकल्प हा १ लाख कुटुंबीयांच्या घरात चूल पेटवण्यासाठी व्हावा अशी आमची इच्छा आहे. कोकणातील बेरोजगारीवर मात करण्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. नाणार प्रकल्पात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांनी ८ हजार एकर जमिनीची संमतीपत्रे मुख्यमंत्र्यांकडे दिलेली आहेत.

या प्रकल्पासाठी १३ हजार एकर जमीन आवश्यक आहे. ६० टक्के जमीन शासनाला मिळत असल्याने आणि हजारो प्रकल्प समर्थकांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करून प्रकल्प करण्यासाठी भूमिका घेतली आहे. त्यामुळे नाणार प्रकल्पाबाबत समर्थकांशी चर्चा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले़ आहे.

खासदार विनायक राऊत यांनी आपला विजय भाजपाच्या दीड ते दोन लाख मतांमुळे झाला हे विसरू नये. प्रकल्पाला विरोध करून बेरोजगार तरुणांची विनाकारण एकप्रकारे हत्या करू नये. ह्यपाठीवर मारा , पण पोटावर कोणाच्या मारू नकाह्ण. कोकणातील तरुण तुम्हांला माफ करणार नाहीत. प्रकल्पाला विरोध करून तरुणांची माथी भडकविण्यापेक्षा त्यांच्या घरातील चुली पेटविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा.

प्रकल्पामुळे येथे जर परप्रांतीय येतील असे तुम्हांला वाटत असेल तर त्यावर चर्चा करा. मुंबईत तुमची सत्ता आहे. मग आता परप्रांतीयांची मुंबई झाली आहे. त्याला कोण जबाबदार? असा टोलाही जठार यांनी लगावला.

Web Title: Rane's BJP admission core committee decision: Pramod Jathar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.