शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

राणेंवरची टीका नडली, शिवसेना तोंडावर आपटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 12:36 IST

Nilesh Rane Sindhudurgnews- नारायण राणेंवर टीका करून मते मागण्याएवढे मतदार दूधखुळे राहिले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची तत्त्वे धुळीस मिळविल्याने त्याचा जनता मतदानातून राग काढत आहे.

ठळक मुद्देराणेंवरची टीका नडली, शिवसेना तोंडावर आपटलीभाजपला भविष्यातही यश :निलेश राणे

मालवण : नारायण राणेंवर टीका करून मते मागण्याएवढे मतदार दूधखुळे राहिले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची तत्त्वे धुळीस मिळविल्याने त्याचा जनता मतदानातून राग काढत आहे.

पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, दीपक केसरकर यांची विकास करण्याची कुवत नसल्यानेच त्यांना नाकारत कोकणातील जनतेने ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये तोंडावर आपटले, अशी टीका भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी केली.मालवण येथील निलरत्न निवासस्थानी राणे यांची पत्रकार परिषद झाली. गयावेळी तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, दीपक पाटकर, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, नगरसेवक गणेश कुशे, विजय केनवडेकर, महेश मांजरेकर आदी उपस्थित होते.राणे यांनी निवडणुकीतील विजयाचे श्रेय मालवणच्या पदाधिकाऱ्यांना दिले. जनतेने पुन्हा एकदा राणे व भाजपवर विश्वास ठेवला. रत्नागिरीतही ३०१ सदस्य भाजपचे निवडून आले. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपलाच यश मिळेल, असा विश्वास राणेंनी व्यक्त केला.राणे म्हणाले, शिवसेनेचे मुख्यमंत्री कोकणचा विकास करण्यास अपयशी ठरले. आमदार नाईकला आमदारकी समजत नाही. त्यामुळे उदय सामंत आणि विनायक राऊत यांनी त्यांचा पद्धतशीर गेम केला आहे. आम्हांला कोरोना दिसला. मात्र, दीपक केसरकर कुठे दिसलेच नाहीत. वैभव नाईकची २०२४ ची निवडणूक शेवटची असेल.

खासदाराची अंगणवाडी सुरू करण्याची कुवत नाही. त्याला केवळ राणेंवर भुंकण्याचे काम मातोश्रीने दिले आहे. चिपी विमानतळाच्या परवानग्या तसेच कराराच्या प्रक्रिया पूर्ण व्हायच्या असून विमानतळ आम्हीच सुरू करू, सत्ताधारी केवळ तारखा जाहीर करत आहेत, असेही ते म्हणाले.उदय सामंत हे पोर्तुगीजांप्रमाणे बोलबच्चनउदय सामंत पोर्तुगीजांप्रमाणे बोलबच्चन आहेत. रत्नागिरीतील दरोडेखोरीची संस्कृती त्यांनी सिंधुदुर्गात आणली आहे.जिल्ह्यातील सर्व रस्त्यांचे ठेके त्यांच्या भावाने घेतले असून डांबरचोर जनतेच्या पैशांवर दरोडा टाकत आहेत. यात विनायक राऊत व त्याच्या मुलाचा वेगळा मीटर सुरू केला आहे. त्यामुळे या डांबरचोरांकडून जनतेने कोणत्या अपेक्षा ठेवायच्या? असा सवाल करत राणेंनी कोकणचा विकास आम्हीच करू, असे सांगितले.

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे BJPभाजपाKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग