Chipi Airport Inauguration: “इथे एकत्र आलेले आहेत उद्धव ठाकरे व नारायण राणे, मला आठवले महायुतीचे गाणे”: रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 04:55 PM2021-10-09T16:55:41+5:302021-10-09T16:57:00+5:30

Chipi Airport Inauguration: सिंधुदुर्गात आली आहे विकासाची आंधी, म्हणून मला इथे येण्याची मिळाली संधी, असे म्हणत रामदास आठवलेंनी चिपी विमानतळावरून कवितांची विमाने उडवली.

ramdas athawale express thoughts in chipi airport inauguration programme | Chipi Airport Inauguration: “इथे एकत्र आलेले आहेत उद्धव ठाकरे व नारायण राणे, मला आठवले महायुतीचे गाणे”: रामदास आठवले

Chipi Airport Inauguration: “इथे एकत्र आलेले आहेत उद्धव ठाकरे व नारायण राणे, मला आठवले महायुतीचे गाणे”: रामदास आठवले

Next

सिंधुदुर्ग: अनेक केंद्रीय आणि राज्यातील दिग्गज मंत्र्यांच्या उपस्थितीत चिपी विमानतळाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अगदी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत जवळपास सर्वच नेत्यांनी तुफान फटकेबाजी केली. यामध्ये केंद्रीयमंत्री सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले हेही मागे राहिले नाहीत. चिपी विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी कवितेच्या माध्यमातून रामदास आठवले यांनी टोलेबाजी केली. (ramdas athawale in chipi airport inauguration)

सिंधुदुर्गच्या विकासाची मजबूत होणार आहे कमान, कारण चिपीमध्ये आले आहे मुंबईवरून विमान, अशी कविता करत चिपी विमानतळाचे श्रेय सर्वांचेच असल्याचे सांगितले. राजकारण बाजूला ठेवून आपण सगळे येथे जमलेलो असून सगळीकडेच राजकारण आणण्याची आवश्यकता नसल्याचेही आठवले म्हणाले. 

सिंधुदुर्गसारख्या जिल्ह्याला समुद्र लाभला 

इथे एकत्र आलेले आहेत उद्धव ठाकरे व नारायण राणे, मला आठवले महायुतीचे गाणे, अशी कविता करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या कार्यक्रमाला येण्याचा आग्रह केला. त्यामुळे या कार्यक्रमाला आलो. सिंधुदुर्गसारख्या जिल्ह्याला समुद्र लाभला आहे, सुंदर डोंगर आहेत तसेच झाडेही आहेत. विमानतळाच्या माध्यमातून येथील नागरिकांना नक्कीच रोजगाराच्या संधी निर्माण होतील. राजकीय विरोधक असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला एकाच व्यासपीठावर एकत्र आले. या विमानतळासाठी अनेकांनी प्रयत्न केलेले आहेत. केंद्रीयमंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि मीदेखील प्रयत्न केलेल आहेत, असे रामदास आठवले यांनी सांगत सिंधुदुर्गात आली आहे विकासाची आंधी, म्हणून मला इथे येण्याची मिळाली संधी, असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या. 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपी विमानतळाचा शुभारंभ झाल्याचे जाहीर करत, आजचा क्षण हा आदळआपट करण्याचा नसून तो आनंद व्यक्त करण्याचा क्षण आहे. आजचा दिवस माझ्यासाठी सौभाग्याचा आहे. आपले कोकण महाराष्ट्राचे वैभव आहे, ते आपण जगासमोर नेत आहोत. जगातून अनेक पर्यटक इथे यावेत यासाठी सुविधा असण्याची गरज आहे. त्या सुविधांमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग हा विमानतळ असतो. शिवसेना आणि कोकणाचे नाते वेगळे सांगायला नको, असे नमूद करत चिपी विमानतळ आंतरराष्ट्रीय करण्याचा मानस असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. 
 

Web Title: ramdas athawale express thoughts in chipi airport inauguration programme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.