शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

अभिमानास्पद! आर. एस. कुलकर्णी यांना ऑर्थोपेडिक क्षेत्रातील के. टी. ढोलकीया गोल्ड मेडल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2022 18:30 IST

अलनॉर स्टायलाईड फ्रॅक्चर इन डिस्टल रेडियस फ्रॅक्चर या विषयावर अभूतपूर्व संशोधन केल्याबद्दल त्यांना हे गोल्ड मेडल जाहीर झाले आहे.

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गचे निवृत्त जिल्हा शल्यचिकित्सक आणि पडवे येथील एस.एस.पी.एम. मेडिकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर. एस. कुलकर्णी यांना अलनॉर स्टायलाईड फ्रॅक्चर इन डिस्टल रेडियस फ्रॅक्चर या विषयावर अभूतपूर्व संशोधन केल्याबद्दल, डॉ. के. टी. ढोलकीया गोल्ड मेडल जाहीर झाले आहे.डॉ. श्यामा मुखर्जी इनडोअर स्टेडियम पणजी, गोवा येथे ६६ व्या ऑल इंडिया ऑर्थोपेडिक कॉन्फरन्स या कार्यक्रमात प्रो. डॉ. नवीन ठाकूर (सेक्रेटरी, इंडियन ऑर्थोपेडिक असोसिएशन) यांनी जाहीर केले आहे. भारतातील एकाच ऑर्थोपेडिक सर्जनला त्यांच्या  संशोधन कार्यासाठी दिले जाते. ही मेडल मिळाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.हे गोल्ड मेडल डॉ. आर. एस. कुलकर्णी यांना गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अमृतसर, पंजाब येथे १७ डिसेंबर २०२२ रोजी ६७ व्या ऑल इंडिया ऑर्थोपेडिक कॉन्फरन्स इनॉग्रल सेरिमनी मध्ये प्रदान करण्यात येणार आहे. गोल्ड मेडल डॉ. आर. एस. कुलकर्णी यांना दीर्घकाळ म्हणजेच तब्बल तीन दशके केलेल्या संशोधनासाठी देण्यात आले असून यामध्ये १९८६ ते २०१६ पर्यंत ४६७२ रुग्णांवर भारत देशामध्ये कोलीज फ्रॅक्चरवर एवढ्या मोठ्या प्रमाणात संशोधन प्रसिद्ध केलेले एकमेव ऑर्थोपेडिक सर्जन आहेत.अश्या प्रकारच्या फ्रॅक्चरवर देवगड ग्रामीण रुग्णालय, कुडाळ ग्रामीण रुग्णालय आणि सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय येथे आपले संशोधन कार्य पार पाडले.या संशोधनासाठी १९९९ मध्ये पुणे येथे महाराष्ट्र ऑर्थोपेडिक एसोसिएशन अॅन्युअल कॉन्फरन्स बेस्ट पेपर प्रझेंटेशन अवॉर्ड मिळाला, तसेच इंडियन सोसायटी फॉर सर्जरी ऑफ द हॅन्ड कडून २०११ कस्तुरबा मेडिकल कॉलेज मणिपाल कर्नाटक येथे यु.एस.एफ. इन डी.आर.टी साठी पुरस्कार मिळाला आहे.स्कॉट इंटरनॅशनल ऑर्थोपेडिक कॉन्फरन्स सिडनी ऑस्ट्रेलिया मध्ये सदर संशोधनावर डॉ. आर. एस. कुलकर्णी यांनी प्रेझेंटेशन दिले असून इंटरनॅशनल ऑर्थोपेडिक कॉन्फरन्स मध्ये एक आणि सब स्पेशलिटी इंटरनॅशनल ऑर्थोपेडिक मीट मध्ये दोन वेळा अलनॉर स्टायलाईड फ्रॅक्चर इन डिस्टल रेडियस फ्रॅक्चर या संशोधनावर प्रेझेंटेशन दिले आहे.   देशात विविध ठिकाणी मार्गदर्शनडाॅ. आर. एस. कुलकर्णी यांनी राष्ट्रीय स्तरावर ऍन्युअल कॉन्फरन्स ऑफ इंडियन ऑर्थोपेडिक असोसिएशन मध्ये चेन्नई २००३, नवी दिल्ली २००६, बेंगळुरू २००८ मणिपाल कर्नाटक २०११ मध्ये अलनॉर स्टायलाईड फ्रॅक्चर इन डिस्टल रेडियस फ्रॅक्चर या विषयावर संबोधित केले असून रिजिनल ऑर्थोपेडिक कॉन्फरन्स पणजी १९८७, बेळगाव १९९३, मुंबई २००३, मणिपाल २०१७, मिरज १९९५, हुबळी १९९६, नागपूर १९९६ तसेच कॉन्फरन्स ऑफ महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशन पुणे २०००, कोल्हापूर २००४, अमरावती २००७, महाबळेश्वर २००८, मंगलोर २००९, सोलापूर २०१५, कोल्हापूर २०१९ मुंबई २०२१ या ठिकाणी अलनॉर स्टायलाईड फ्रॅक्चर इन डिस्टल रेडियस फ्रॅक्चर या संशोधनावर मार्गदर्शन केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग