शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

गुहागर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत जोरदार हाणामारी

By admin | Updated: December 29, 2014 00:11 IST

नगराध्यक्षही सहभागी : दोन्ही बाजूंच्या सभासदांनी एकमेकांना चोपले -पोलीस ठाण्यात तक्रार

असगोली : गुहागर एज्युकेशन सोसायटीच्या पहिल्याच निवडणुकीत आज, रविवारी जोरदार हाणामारी झाली. त्रुटी असल्यामुळे निवडणूक घेऊ नये, अशी मागणी करणारा गट आणि तरीही निवडणूक घेण्याचा प्रयत्न करणारा गट एकमेकांच्या अंगावर धावून गेले. नगराध्यक्ष जयदेव मोरे यांनी संस्थेचे सेक्रेटरी उदय जोशी यांना थोबाडीत मारली. यानंतर हाणामारीस सुरुवात झाली. यावेळी खुर्च्यांची मोडतोड करण्यात आली. हाणामारीचा प्रकार वाढल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि त्यानंतर पुढील निवडणूक प्रक्रिया पार पडली. गुहागर एज्युकेशन सोसायटीची सन २०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीकरिता नवीन नियामक मंडळाची निवडणूक आज आयोजित करण्यात आली होती. संस्थेचे अध्यक्ष महेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरू झाली. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी पद्माकर आरेकर व महेश भोसले यांच्यात निवडणूक होणार होती. सचिवपदासाठी दोन अर्ज, खजिनदार पदासाठी दोन अर्ज, तर संचालकपदासाठी ३३ अर्ज प्राप्त झाले होते. संस्थेत एकूण १३ जणांचे नियामक मंडळ असून, सुदर्म आरेकर हे पदसिद्ध सदस्य आहेत.ही सभा दिलेल्या वेळेत सकाळी १० वाजता सुुरू झाली. सभेचे वातावरण सुरुवातीपासून चांगलेच तापले होते. मागील इतिवृत्त वाचन होऊन त्याला काही दुरुस्त्या सुचवून मंजुरी देण्यात आली. त्यानंतर पुढील पाच वर्षांच्या अंदाजपत्रकाचे वाचनही काही सूचना देत मंजूर केले.विषय क्रमांक चार हा निवडणूक प्रक्रियेचा असल्याने ही निवडणूक प्रक्रिया होणार आहे, असे अध्यक्ष महेश भोसले यांनी जाहीर केले. मात्र, या निवड प्रक्रियेला आपला विरोध असल्याचे संस्थेचे माजी पदाधिकारी किरण खरे यांनी सांगितले आणि त्यांनी आपला मुद्दा सभागृहात सांगितला. पोलीस ठाण्यात तक्रारनिवडणूक समर्थकांकडून मारहाण झालेल्या पराग शंकर मालप (वय ३२, रा. गुहागर) यांनी गुहागर पोलीस ठाण्यात रोहन नवनाथ भोसले, समीर देवकर, प्रकाश मारुती कचरेकर, मिलिंद सुर्वे या चौघांवर भरसभेमध्ये शिवीगाळ करत आणि ठार मारण्याची धमकी देत मारहाण केल्याची तक्रार दाखल केली.