स्थानिक कलाकारांना व्यासपीठ देणे हाच हेतू

By Admin | Updated: January 29, 2015 23:37 IST2015-01-29T21:59:47+5:302015-01-29T23:37:49+5:30

बबन साळगावकर : देशभक्तीपर नृत्य स्पर्धेला चांगला प्रतिसाद

The purpose is to give a platform to local artists | स्थानिक कलाकारांना व्यासपीठ देणे हाच हेतू

स्थानिक कलाकारांना व्यासपीठ देणे हाच हेतू

सावंतवाडी : दरवर्षी सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे देशभक्तीपर कार्यक्रम राबविले जातात. या कार्यक्रमांतून स्थानिक कलाकारांना भव्य व्यासपीठ मिळते आणि हाच याचा उद्देश असतो. मुलांनी या संधीचा फायदा घ्यावा व शिक्षकांनीही योग्य ते मार्गदर्शन करावे, असे आवाहन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले.
नगरपरिषदेच्या महिला व बालविकास समितीतर्फे देशभक्तीपर नृत्य स्पर्धा येथील बॅ. नाथ पै सभागृहात झाली. याप्रसंगी ते बोलत होते. मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे, महिला व बालकल्याण सभापती वैशाली पटेकर, नगरसेवक अनारोजीन लोबो, कीर्ती बोंद्रे, संजय पेडणेकर, साक्षी कुडतरकर, अफरोज राजगुरू, आदी याप्रसंगी उपस्थित होते.
यावेळी सावंतवाडीतील शाळेतील मुलांनी देशभक्तीपर नृत्ये सादर केली. यामध्ये पहिली ते चौथी गटांत प्रथम क्रमांक मिलाग्रीस मराठी प्रायमरी स्कूल, द्वितीय जिल्हा परिषद शाळा नं. ४, तृतीय सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी शाळा, तर उत्तेजनार्थ जिल्हा परिषद शाळा नं. २ यांनी मिळविला.
पाचवी ते सातवी या गटांत प्रथम कळसुलकर इंग्लिश स्कूल, द्वितीय जिल्हा परिषद शाळा नं. ४, तृतीय सेंट्रल स्कूल व उत्तेजनार्थ आरपीडी हायस्कूल यांनी मिळविला. आठवी ते दहावी गटांत प्रथम क्रमांक वि. स. खांडेकर विद्यालय, भटवाडी, द्वितीय मिलाग्रीस हायस्कूल, तृतीय आरपीडी हायस्कूल व उत्तेजनार्थ क्रमांक कळसुलकर हायस्कूलने मिळविला.
याच दरम्यान २४ जानेवारी रोजी सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीतर्फे जनरल जगन्नाथराव भोसले स्मृती शिवउद्यान येथे पहिली ते चौथीच्या मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रथम क्रमांक आर्य शिरसाट (मिलाग्रीस मराठी प्रायमरी स्कूल), द्वितीय अथर्व ज्ञानेश्वर सावंत (मिलाग्रीस मराठी प्रायमरी स्कूल), तृतीय पूर्वा शामसुंदर टोपले (मिलाग्रीस मराठी प्रायमरी स्कूल) उत्तेजनार्थ कृषी मेघनाथ लेले जिल्हा परिषद शाळा नं. २ यांनी मिळविला.
टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनविणे स्पर्धेत पाचवी ते सातवी गटात मिलिंद पुरुषोत्तम कासार (आरपीडी हायस्कूल), आर्या आनंद कासार (शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल), आयोशा आमिन खालील (सेंट्रल इंग्लिश स्कूल) यांनी प्रथम तीन, तर शृजन हरिहर वाटवे (जिल्हा परिषद शाळा नं. ४) याने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. या सर्व विजयी मुलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली.
या स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी नगरपरिषदेच्या कर्मचारी परवीन शेख यांनी मेहनत घेतली. (वार्ताहर)

Web Title: The purpose is to give a platform to local artists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.