राष्ट्रवादीकडून सार्वजनिक बांधकाम अभियंता धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 16:43 IST2021-07-03T16:41:01+5:302021-07-03T16:43:00+5:30
Pwd Sawantwadi Sindhudurg : सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत माने यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने घेराव घालत आंबोली घाट दुरवस्था, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी, चौकुळ बेरडकी रस्ता, मळगाव घाट रस्ता आदींबाबत जाब विचारला. आंबोली घाटात दरड कोसळत असून गटार, नालेसफाई झालेली नाही. यामुळेच ही दरड कोसळत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केला आहे.

राष्ट्रवादीकडून सार्वजनिक बांधकाम अभियंता धारेवर
सावंतवाडी : सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत माने यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने घेराव घालत आंबोली घाट दुरवस्था, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी, चौकुळ बेरडकी रस्ता, मळगाव घाट रस्ता आदींबाबत जाब विचारला. आंबोली घाटात दरड कोसळत असून गटार, नालेसफाई झालेली नाही. यामुळेच ही दरड कोसळत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केला आहे.
यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, हिदायतुल्ला खान, राजू धारपवार, दर्शना बाबर-देसाई, बावतीस फर्नांडिस, नंदू साटेलकर, आसिफ शेख, सुरेश वडार, अर्षद बेग, जहिरा ख्वाजा, आसिफ ख्वाजा, नंदकिशोर नाईक, इफ्तिकार राजगुरू, याकुब शेख, कौस्तुभ नाईक आदी उपस्थित होते.
आंबोली घाटाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष याला कारणीभूत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. तर उपजिल्हा रुग्णालयातील अर्धवट कामाबाबत, चौकुळ बेरडकी रस्ता कामात झालेलं निकृष्ट दर्जाचे काम, मळगाव घाट रस्ता दुरुस्ती आदीकडे लक्ष वेधले. यावेळी कार्यकारी अभियंता माने यांनी आंबोली, चौकुळ बेरडकी येथे उद्या प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आश्वासन दिले. तर उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून काम सुरू करण्यास आठ दिवसांत सांगावे असे सांगितले.