देवगडात चिनी वस्तूंची होळी करीत निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 16:07 IST2020-06-19T16:06:12+5:302020-06-19T16:07:04+5:30
देवगड तालुका भाजपाच्यावतीने गुरुवारी चिनी वस्तूंची होळी करीत चीनचा निषेध करण्यात आला. भारताच्या सीमेवर चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ देवगड भाजपाच्यावतीने चीनचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी चीनविरोधात घोषणाबाजी करून चिनी वस्तूंची होळी करण्यात आली.

देवगड येथील भाजपा कार्यालयासमोर भाजपा पदाधिकाऱ्यांनी चीनचा निषेध करीत चिनी वस्तूंची होळी केली.
ठळक मुद्देदेवगडात चिनी वस्तूंची होळी देवगड भाजपाच्यावतीने चीनचा तीव्र निषेध
देवगड : देवगड तालुका भाजपाच्यावतीने गुरुवारी चिनी वस्तूंची होळी करीत चीनचा निषेध करण्यात आला.
भारताच्या सीमेवर चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ देवगड भाजपाच्यावतीने चीनचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी चीनविरोधात घोषणाबाजी करून चिनी वस्तूंची होळी करण्यात आली.
यावेळी माजी आमदार अॅड. अजित गोगटे, सभापती सुनील पारकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, जिल्हा परिषद सदस्या मनस्वी घारे, संजय बांबुळकर, नगरसेवक योगेश चांदोस्कर, नगरसेविका प्राजक्ता घाडी, उष:कला केळुस्कर, मुकुंद फाटक, शरद ठुकरूल, यश रानडे आदी उपस्थित होते.