सावंतवाडीत नगरपालिकेकडून मालमत्ता सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 19:56 IST2021-03-23T19:56:11+5:302021-03-23T19:56:55+5:30
Sawantwadi Sindhudurg- सावंतवाडी नगरपरिषदेमार्फत घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची जोरदार मोहीम राबविण्यात येत असून जे मालमत्ताधारक कर थकवत असून त्याच्या मालमत्ता सील करण्याची कारवाई करण्यात येत आहे. ही धडक मोहीम सावंतवाडी नगरपालिकेने सोमवारपासून राबवली आहे. यात पाच मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत.

सावंतवाडीत नगरपालिकेकडून मालमत्ता सील
सावंतवाडी : नगरपरिषदेमार्फत घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची जोरदार मोहीम राबविण्यात येत असून जे मालमत्ताधारक कर थकवत असून त्याच्या मालमत्ता सील करण्याची कारवाई करण्यात येत आहे. ही धडक मोहीम सावंतवाडी नगरपालिकेने सोमवारपासून राबवली आहे. यात पाच मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत.
सावंतवाडी नगरपालिकेने घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीची जोरदार मोहीम राबवली असून या पथकातील कर्मचारी घरोघरी जाऊन वसुली करीत आहेत. तरी शहरातील मालमत्ताधारक व नळकनेक्शनधारक यांनी त्यांच्याकडील घरपट्टी व पाणीपट्टीची रक्कम पथकातील कर्मचारी प्रत्येकाच्या घरी जाऊन वसुली करीत आहेत.
जे मालमत्ताधारक थकीत आहेत अशा मालमत्ता सील करण्यास नगरपरिषदेने सुरुवात केलेली असून सबनीसवाडा विभागातील ५ मालमत्ता सील करण्यात आलेल्या आहेत व यापुढेही थकीत मालमत्ताधारकांच्या मालमत्ता अशा प्रकारे सील करण्याची कार्यवाही करण्यात येईल असा इशारा पालिकेने दिला आहे. तरी नागरिकांनी घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीस सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी केले आहे.