शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

स्कुबा डायव्हिंग सेंटरवर ग्रामस्थांचा निषेध मोर्चा

By admin | Updated: January 29, 2015 00:09 IST

अधिकाऱ्यांची पाठ

मालवण : महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्यावतीने उभारण्यात आलेल्या स्कुबा डायव्हिंग सेंटरच्या नामांतर वादाच्या पार्श्वभूमीवर स्कुबा डायव्हिंग सेंटरवर तारकर्ली गावाचे नाव असावे, या मागणीसाठी बुधवारी तारकर्ली ग्रामस्थ एकवटले. यावेळी स्कुबा डायव्हिंग सेंटरवर तारकर्ली ग्रामस्थांनी निषेध मोर्चा काढला.महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्यावतीने तारकर्ली मध्यवर्ती आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हिंग सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन २९ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार होते. मात्र या वादामुळे उद्घाटन रद्द झाल्याची चर्चा तारकर्ली परिसरात सुरू होती.स्कुबा डायव्हिंग सेंटरची इमारत अनधिकृत असून अशा अनधिकृत इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असेल तर याला आपला विरोध असल्याची भूमिका तारकर्ली ग्रामस्थांनी मंगळवारी विशेष सभेत घेतली. शिवाय महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या मनमानी कारभाराविरोधात जाब विचारण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यानुसार तारकर्ली ग्रामस्थांनी बुधवारी स्कुबा डायव्हिंग सेंटरवर निषेध मोर्चा काढला. नामांतराबाबत प्रांताधिकारी, तहसीलदार हे निर्णय घेऊ शकले नाहीत. सेंटरच्या नामफलकावरून तारकर्लीचे नाव महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी गायब केले यामुळे या अधिकाऱ्यांना निलंबन करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. स्कुबा डायव्हिंग सेंटरचे भूमिपूजन तत्कालिन महसूलमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले होते. यावेळी तारकर्ली नावाची पाटी होती, त्याची चौकशी व्हावी.तारकर्ली नावाच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने आता तारकर्ली गावाचे नाव असावे, अशी आपली ठाम भूमिका आहे. जोपर्यंत तारकर्ली नाव लागत नाही तोपर्यंत इमारतीचे उद्घाटन होऊ देणार नाही. कोणीही मंत्री आला तर त्यांना काळे झेंडे दाखवू, असा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांची पाठस्कुबा डायव्हिंग सेंटरच्या इमारतीला तारकर्ली नाव असावे. तारकर्ली नाव हटविणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी बुधवारी तारकर्ली ग्रामस्थांनी सेंटर येथे निषेध मोर्चा नेला. प्रवेशद्वारावर ठिय्या केला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अर्धा तास ग्रामस्थांनी महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या अधिकाऱ्यांची वाट पाहिली, मात्र अधिकाऱ्यांनी मोर्चाची कोणतीही दखल घेतली नाही. ग्रामस्थांनी वाट पाहून माघार घेतली.