पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुख सभेच्या जिल्हाध्यक्षपदी विजय भोगले, सचिवपदी सुहास सावंत
By Admin | Updated: May 3, 2017 16:09 IST2017-05-03T16:09:45+5:302017-05-03T16:09:45+5:30
सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी विजय भोगले, कार्याध्यक्षपदी धोंडू रेडकर तर सचिवपदी सुहास सावंत यांची निवड करण्यात आली आहे.

पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुख सभेच्या जिल्हाध्यक्षपदी विजय भोगले, सचिवपदी सुहास सावंत
ऑनलाइन लोकमत
कणकवली, दि. 3 - महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक आणि केंद्रप्रमुख सभेच्या जिल्हा शाखेच्या सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी विजय भोगले, कार्याध्यक्षपदी धोंडू रेडकर तर सचिवपदी सुहास सावंत यांची निवड करण्यात आली आहे. कणकवली येथे रविवारी झालेल्या संघटनेच्या जिल्हा अधिवेशनात ही निवड करण्यात आली आहे.
यावेळी सन 2017 ते 2020 या कालावधीसाठी जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. यामध्ये उपाध्यक्ष वीरधवल परब, स्नेहा लंगवे, धनंजय चव्हाण, सहसचिव शांताराम सावंत, वासुदेव मराठे, कोषाध्यक्ष चंद्रकांत तांबे, संघटक सदानंद सावंत, नंदकिशोर गोसावी, उत्तम सूर्यवंशी, समील घुगरे, भागवत बुधकर, महेश परुळेकर, सूर्यकांत नाईक, महिला प्रतिनिधी स्नेहलता राणे, भारती वेंगुर्लेकर, रुची कवटकर, शुभांगी सावंत, प्रतिमा पोकळे, अदिती राणे, सदस्य रवींद्र गवस, मारुती गावडे, बाळासाहेब शेळके, अनघा लाड, सल्लागार सुरेश पेडणेकर, रवींद्रनाथ मुसळे, अनंत राणे, सुहास आरोलकर, भिकाजी तळेकर तर पदसिद्ध सदस्य म्हणून संघटनेच्या सर्व तालुकाध्यक्ष आणि सचिवांचा समावेश करण्यात आला आहे. निवड झालेल्या सर्व सदस्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.