Prize for giving information on murder of woman in Amboli Ghat | आंबोली घाटातील महिलेच्या खुनाची माहिती देणाऱ्याला बक्षीस
आंबोली घाटातील महिलेच्या खुनाची माहिती देणाऱ्याला बक्षीस

सावंतवाडी :  आंबोली येथील खोल दरीत आढळून आलेल्या अज्ञात महिलेच्या मृतदेहाच्या तपासासाठी सावंतवाडी पोलिसांनी जोरदार सूत्रे फिरवण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित महिलेची माहिती देणाऱ्या व्यक्तीला दहा हजार रुपयांचे बक्षीस पोलिसांनी जाहीर केले आहे. आंबोली खोल दरीत काही महिन्यांपूर्वी अज्ञात महिलेचा मृतदेह मिळाला होता. पोलिसांनी सखोल तपास केला, पण मृत महिलेची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले नव्हते. त्यामुळे आता पोलिसांनी बक्षीस जाहीर केले आहे.


Web Title: Prize for giving information on murder of woman in Amboli Ghat
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.