पारंपरिक मच्छिमारांचे शुक्रवारी जेलभरो

By Admin | Updated: November 4, 2015 00:10 IST2015-11-03T23:20:36+5:302015-11-04T00:10:52+5:30

एकतर्फी कारवाईचा निषेध : तहसील कार्यालयात आत्मसमर्पण करणार

Prison Fleet on Traditional Fishermen's Fridays | पारंपरिक मच्छिमारांचे शुक्रवारी जेलभरो

पारंपरिक मच्छिमारांचे शुक्रवारी जेलभरो

मालवण : आचरा बंदर येथे घडलेल्या पर्ससीनधारक व पारंपरिक मच्छिमार यांच्यातील संघर्षानंतर पारंपरिक मच्छिमारांवर गुन्हे दाखल करून अटकसत्राची एकतर्फी कारवाई पोलिसांनी हाती घेतली आहे. आचरा येथील हल्ल्यास पर्ससीनधारक तसेच पोलीस प्रशासन व मत्स्य व्यवसाय खाते जबाबदार आहे. पारंपरिक मच्छिमारांवर प्राणघातक हल्ले करणारे अनधिकृत पर्ससीनधारकांवर कारवाई न होता निरपराध पारंपारिक मच्छिमारांच्या होत असलेल्या अटकेच्या निषेधार्थ सिंधुदुर्गातील शेकडो पारंपरिक मच्छिमार शुक्रवार ६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता मालवण तहसील कार्यालय येथे आत्मसमर्पण करत जिल्हाव्यापी जेलभरो आंदोलन करणार आहेत.
मच्छिमार नेते रविकिरण तोरसकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मच्छिमारांची भूमिका स्पष्ट केली आहे. अनधिकृत पर्ससीन होड्यांवर कारवाई करत असताना स्थानिक मच्छिमार नारायण कुबल यांनी पोलीस प्रशासनास माहिती दिली. मात्र पुरेसे पोलीस बळ घटनास्थळी नव्हते. त्या दरम्यान, मत्स्य विभागास सहकार्य करणाऱ्या पारंपरिक मच्छिमार पेडणेकर यांना मारहाण झाली. तर मत्स्य व्यवसाय अधिकारी सुगंधा चव्हाण यांना शिवीगाळ करून सरकारी कामात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, पेडणेकर यांच्या मारहाणीचे वृत्त त्यांचे नातेवाईक विजय ढोके यांना समजताच ते घटनास्थळी पोहचले. त्यावेळी अनधिकृत पर्ससीन धारकाकडून प्राणघातक हल्ला झाला. ढोके जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्यावर हल्ले करणाऱ्यांविरोधात कोणतेही गुन्हे दाखल न करता मच्छिमारांवर गुन्हे दाखल केले. यात १९ मच्छीमारांसह आठ महिलांवर अटकेची कारवाई झाली आहे. याविरोधात जेलभरो आंदोलन निश्चित झाल्याचे पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Prison Fleet on Traditional Fishermen's Fridays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.