शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

सावंतवाडी नगरपालिकेचा शिल्लकी अर्थसंकल्प सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 12:49 IST

कोणतीही मोठी दरवाढ न करता सावंतवाडी नगरपालिकेने आपला २९ कोटी शिल्लकी अर्थसंकल्प सादर केला. पाणीपट्टी आरोग्य तसेच घरपट्टी आदींना कुठेही हात न लावता तसेच नागरिकांवर या अर्थसंकल्पाचा कोणताही कराचा भार येणार नाही. याची पुरेपुर काळजी नगरपालिकेने घेतली आहे. अर्थसंकल्पानंतर सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या सर्वच नगरसेवकांनी एकमताने पाठिंबा दर्शविला. दरम्यान शहरातील संत गाडगेबाबा भाजी मंडईसाठी २५ कोटी रूपयांची तरतूद केली आहे.

ठळक मुद्देसावंतवाडी नगरपालिकेचा शिल्लकी अर्थसंकल्प सादर साळगावकर यांनी मांडला सलग आठवा अर्थसंकल्प

सावंतवाडी : कोणतीही मोठी दरवाढ न करता सावंतवाडी नगरपालिकेने आपला २९ कोटी शिल्लकी अर्थसंकल्प सादर केला. पाणीपट्टी आरोग्य तसेच घरपट्टी आदींना कुठेही हात न लावता तसेच नागरिकांवर या अर्थसंकल्पाचा कोणताही कराचा भार येणार नाही. याची पुरेपुर काळजी नगरपालिकेने घेतली आहे. अर्थसंकल्पानंतर सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या सर्वच नगरसेवकांनी एकमताने पाठिंबा दर्शविला. दरम्यान शहरातील संत गाडगेबाबा भाजी मंडईसाठी २५ कोटी रूपयांची तरतूद केली आहे.सावंतवाडी नगरपालिकेची अर्थसंकल्पीय बैठक नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी सकाळी येथील लोकमान्य टिळक सभागृहात पार पडली.

यावेळी मुख्याधिकारी जंयत जावडेकर, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेविका अनारोजीन लोबो, शुभांगी सुकी, भारती मोरे, माधुरी वाडकर, दिपाली सावंत, दिपाली भालेकर, समृध्दी विर्नोडकर, उत्कर्षा सासोलकर, नगरसेवक बाबू कुडतरकर, मनोज नाईक, आनंद नेवगी, राजू बेग, सुधीर आडिवरेकर, सुरेंद्र बांदेकर, उदय नाईक, डॉ.जयेंद्र परूळेकर आदी उपस्थित होते.सावंतवाडी नगरपालिकेची प्रारंभिक शिल्लक ही २८ कोटी ४७ लाख ९३ हजार एवढी होती. तर एकूण महसुली जमा ६८ कोटी ४६ लाख ४२ हजार एवढी असून, पालिकेचा खर्च ८४ कोटी ५२ लाख ७० हजार एवढा आहे. चालूवर्षी पालिकेने नगरोत्थान योजनेसाठी २१ कोटीची तर चौदाव्या वित्त आयोगासाठी ३ कोटी ५० लाख वैशिष्टपूर्ण अनुदान, ५ कोटी अल्पसंख्यांक, १० लाख रस्ते विकास, सर्वसाधारणपणे ३५ लाख रस्ते विकासविशेष अनुदान, २ कोटी दलित वस्ती सुधारणा, ५० लाख नाविन्य पूर्ण योजनेसाठी, १ कोटी ४ लाख प्रादेशिक पर्यटन योजना, घनकचरा व्यवस्थापन ९० लाख, अग्निशमन साठी म्हणजेच फायर स्टेशल बांधणे तसेच नवीन बंब खरेदी करण्यासाठी २ कोटी रूपयांची तरतूद केली आहे.या शिवाय डिसेंट्रलाईज सांडपाणी प्रकल्पास प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच गाडगेबाबा भाजी मंडई बांधकामसाठी २५ कोटी, मटण मार्केट बांधकाम करणे २ कोटी घनकचरा व्यवस्थापन २ कोटी ६४ लाख, बोटक्लब २५ लाख खेळपट्टी बनविण्यासाठी २० लाख, शैक्षणिक उपक्रमासाठी २ लाख, दिव्यांग व अपंग योजनासाठी १० लाख, घंटागाडी खरेदी ४ लाख, वाहने मशिनरी खरेदी ३५ लाख, पाणी पुरवठा योजनेसाठी ७० लाख रूपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्या िशवाय जन्म मृत्यू दाखला दुरूस्ती १० रूपयांवरून थेट १०० रूपये करण्यात आली आहे.सावंतवाडी नगरपालिकेने फिरत्या व्यापाऱ्याना ५० रूपये कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जिमखान्यावरची खेळपट्टी ही अत्याधुनिक होणार आहे. नवीन पाण्याची योजना पालिका आणणार आहे, असे यावेळी जाहीर करण्यात आले. त्यामुळे कोणतीही दरवाढ न आकारता प्रथमच पालिकेने हा अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पानंतर सर्व सदस्यांनी एकमताने अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. तर नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांनी व्यायाम शाळेची फी ५०० रूपये करण्यावर आक्षेप घेतला. मात्र नगराध्यक्ष साळगावकर यांनी ही फि व्यायाम शाळा अद्यावत केल्यावर आकारली जाईल, असे सांगितले.सलग आठवा अर्थसंकल्प मांडण्याचा माननगराध्यक्ष बबन साळगावकर यांना सलग आठवा अर्थसंकल्प मांडण्याचा मान मिळाला आहे. यावेळी नगरसेवक राजू बेग यांनी आता तुम्ही राज्याचा अर्थसंकल्प मांडा, असे सांगत कौतुक केले. तर नगराध्यक्ष साळगावकर यांनीही आपणास हा सलग आठव्यांदा अर्थसंकल्प मांडण्याचा मान दिल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाBudgetअर्थसंकल्पsindhudurgसिंधुदुर्ग