शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

कोकणात गणेशोत्सव परतीच्या प्रवासाची एसटीकडून सज्जता

By admin | Updated: August 29, 2014 23:10 IST

के.बी. देशमुख : ८१० गाड्यांचे आरक्षण$

रत्नागिरी : कोकणात गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत असल्यामुळे मोठ्या संख्येने मुंबईकर गावाकडे परतली आहेत. मुंबईकरांच्या परतीच्या प्रवासासाठी एस. टी.कडून सोय करण्यात आली आहे. आतापर्यंत परतीच्या ८१० गाड्यांचे आरक्षण झाले असल्याची माहिती रत्नागिरीचे विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांनी यावेळी दिली. गणेशोत्सव म्हणजे सर्व सणांचा राजा. त्यामुळे गणेशभक्तांच्या प्रवासात कुठलीही अडचण येऊ नये, यासाठी एस. टी. प्रशासन सर्वतोपरी काळजी घेत आहे. यावर्षी कोकणात १९१३ जादा गाड्या आल्या असून, गतवर्षीपेक्षा यावर्षी २१३ गाड्या अधिक आल्या आहेत. रत्नागिरी विभागामध्ये १४०० गाड्या आल्या आहेत. अवजड वाहनांसाठी मुंबई-गोवा महामार्ग बंद केल्याने त्यांचा मोर्चा स्वाभाविकच पुणे, सातारा, कोल्हापूर मार्गावर वळला असला तरी गणपतीसाठी कोकणात खासगी कार, गाड्याने येणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने महामार्गावर गर्दी दिसूून येत आहे. एस. टी.ची वाहतूक मात्र नेहमीच्याच मार्गावरून सुरू आहे.राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे सालाबादप्रमाणे गणेशोत्सवाकरिता मुंबईकरांना गावी आणण्यासाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, पालघर येथून १९१३ जादा गाड्या प्रवाशांना घेऊन आल्या आहेत. गणेशोत्सवानंतर मुंबईकरांच्या परतीच्या प्रवासासाठी ८१० जादा गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे.दररोजच्या १५० गाड्यावगळता दि. ४ ते १० सप्टेंबरअखेर ८१० गाड्यांचे एस. टी. प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. दि. ४ रोजी ८१, दि. ५ रोजी २००, दि. ६ रोजी २९०, दि. ७ रोजी १५०, दि. ८ रोजी ५०, दि. ९ रोजी ३०, दि.१० रोजी ९ गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे. दि. ६ रोजी सर्वाधिक गाड्या मुंबईकडे सोडण्यात येणार आहेत. प्रत्येकाला तिकीट मिळण्याची सुविधा राज्य परिवहन महामंडळाने केली आहे. गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर गणेशभक्त मुंबईहून तसेच बाहेरून येणार, हे गृहित धरून एस. टी. प्रशासनाने भक्तांसाठी येणाऱ्या व परतीच्या गाड्यांचे चोख नियोजन केले आहे. (प्रतिनिधी)तारीखजादा गाड्या ४ सप्टेंबर८१५ सप्टेंबर२००६ सप्टेंबर२९०७ सप्टेंबर १५०८ सप्टेंबर५०९ सप्टेंबर३०१० सप्टेंबर९