शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

मायनिंगचे हस्तक म्हटल्यानेच निषेध, प्रेमानंद देसाई यांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2019 19:55 IST

दोडामार्ग तालुक्यातील पर्यावरणाबरोबरच तेथील रहिवाशांचे जीवन पर्यावरणपूरक व समृद्ध रहावे यासाठी आमची लढाई ही खंत नसून इको सेन्सिटिव्हविरोधी दोडामार्ग बचाव मंचने काढलेला मोर्चा पाहून स्टॅलिन दयानंद यांना उपरती झाली आहे.

सावंतवाडी - दोडामार्ग तालुक्यातील पर्यावरणाबरोबरच तेथील रहिवाशांचे जीवन पर्यावरणपूरक व समृद्ध रहावे यासाठी आमची लढाई ही खंत नसून इको सेन्सिटिव्हविरोधी दोडामार्ग बचाव मंचने काढलेला मोर्चा पाहून स्टॅलिन दयानंद यांना उपरती झाली आहे. शेतकऱ्यांना मायनिंगचे हस्तक म्हणणे कितपत योग्य आहे? त्यामुळे आम्ही निषेध केला, असे मत सिंधुदुर्ग सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले.वनशक्तीचे संदीप सावंत यांनी शनिवारी दोडामार्गबाबत आपली भूमिका मांडली. त्यानंतर त्यावर देसाई यांनी पत्रकातून उत्तर दिले आहे.या पत्रकात देसाई यांनी म्हटले आहे की, २३ डिसेंबर रोजी स्टॅलिन दयानंद यांनी आपले म्हणणे दोडामार्ग येथे येऊन मांडावे, दोडामार्ग विषयीच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अशाप्रकारे आवाहन करण्यात आले होते. दोडामार्ग येथे तारीख व वेळ जाहीर करून यावे व आमच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे द्यावीत, असे आवाहन सरपंच सेवा संघामार्फत केले होते. त्याला वेळेत उत्तरे दिली असती तर शेतकºयांचे संभ्रम दूर केले असते. येथील शेतकºयांना मायनिंगचे हस्तक ठरविले नसते, तर स्टॅलिन दयानंद यांचा निषेध करण्याचा प्रसंग आला नसता.पण केवळ आपली संस्था वनशक्ती फाऊंडेशनला मिळणारे विदेशी फंड चालू रहावेत तसेच आपल्या पोटापाण्यासाठी दोडामार्गमधील शेतकºयांना नाहक वेठीस धरून त्यांच्या उपजीविकेच्या साधनांवर, वृक्ष, शेतीवर निर्बंध आणून स्वत:ला पर्यावरणवादी ठरविण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी शेतक-यावर संक्रांत आली तरी स्टॅलिन यांना फरक पडत नाही.दोडामार्गमधील शेतक-यांच्या नावावर असणा-या खासगी, सामाईक जमिनी ह्या कवळकाड, बागायती, नागली शेती, काजू बागायती असून, काही प्रमाणात दगडसदृश व तीव्र उताराच्या आहेत. या जमिनीवर उपलब्ध साधनसामग्रीवर शेतकरी आपली उपजीविका करतो.वनविभागाकडून आलेल्या पत्राचा स्टॅलिन दयानंद व संदीप सावंत यांनी अभ्यास करावा. सरसकट वृक्षतोड बंदी व भविष्यातील प्लॉट डेव्हलपमेंट,फेरपालटाने नागली शेती, दगडातील क्वॉरी, चिरेखाण ही उपजीविकेची साधने नष्ट होणार असतील तर स्टॅलिन यांची पूजा करून पोट भरणार काय? असा पलटवार केला आहे. यापूर्वी त्यांनी किती शेतक-यांच्या भेटी घेऊन सविस्तर चर्चा करून पर्यावरणाचा विषय समजावून सांगितला हे जाहीर करणे आवश्यक असताना फक्त उंचावरून शेळ््या हाकून इथला शेतकरी संपवून फक्त वनशक्ती फाऊंडेशन जगविण्यासाठी प्रयत्न करू नये, असा सल्लाही दिला आहे.

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग