शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अवैद्य धंद्यांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात प्रदीप मांजरेकरांचे आंदोलन, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 13:40 IST

या आंदोलनाची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दखल घेतली असून त्यांनी याबाबत तातडीने गृहराज्यमंत्री सतेज पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याशी चर्चा करून कारवाईच्या सूचना देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती मांजरेकर यांनी दिली.

कणकवली : कणकवली पोलिस ठाण्याच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या विरोधात राज्यात सत्ताधारी असलेल्या राष्ट्रीय काँग्रेसचे कणकवली तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी ओरोस येथे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तीन दिवसांचे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचीकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दखल घेतली असून त्यांनी  मांजरेकर यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत याबाबत तातडीने गृहराज्यमंत्री सतेज पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याशी चर्चा करून कारवाईच्या सूचना देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती मांजरेकर यांनी दिली.याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  कणकवली तालुक्यातील वागदे येथील साईबाबा सोशल क्लब जुगार अड्ड्यावर कॅरम स्पर्धेच्या उद्घाटनासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. ३० ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत साईबाबा सोशल क्लब वागदे येथे स्पर्धा आयोजीत केली होती. या ठिकाणी जुगार चालतो. या बाबत आपण ८ नोव्हेंबर २०२१ रोजी आपल्याकडे तक्रार केली होती. या स्पर्धेला कणकवली पोलिस स्टेशनचे अधिकारी सागर खंडागळे व शरद देठे पोलिस गणवेशात उपस्थित होते. २१ फेब्रुवारी २०२१ रोजी वागदे सरपंच यांनी संबधित क्लबबाबत तक्रार आपल्याकडे तसेच कणकवली पोलिस ठाणे व कणकवली तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. असे असताना पोलीस कारवाई करीत नाहीत. कणकवली पोलिसांनी छापा टाकला. परंतु, अगोदरच माहिती मिळाल्याने तिथे काही आक्षेपार्ह मिळू शकले नाही. त्यामुळे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत?  हे शोधले पाहिजे. सध्या या अवैध धंद्यामुळे कणकवली तालुका हा जिल्ह्यात बदनाम झालेला आहे. म्हणून या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी अपेक्षा आहे, असे प्रदीप मांजरेकर यांनी नमूद केले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिसcongressकाँग्रेसagitationआंदोलन