शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

एमबीबीएस झालेल्यांसाठी पदव्युत्तर पदविका

By admin | Updated: August 5, 2015 00:18 IST

२० रुग्णालयांना लाभ : अभ्यासक्रम जिल्हा रुग्णालयांमध्येच

प्रकाश वराडकर- रत्नागिरी -राज्यभरात जिल्हा रुग्णालये व अन्य शासकीय रुग्णालयांमधील डॉक्टर्सच्या अनेक जागा रिक्त आहेत. ही कमतरता लक्षात घेऊन वैद्यकीय महाविद्यालय नसलेल्या प्रत्येक जिल्हा रुग्णालयात राज्य शासनामार्फत कॉलेज आॅफ फिजिशियन्स अ‍ॅण्ड सर्जन (पीसीएस) योजनेंतर्गत एम.बी.बी.एस. केलेल्यांसाठी पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम येत्या सप्टेंबर किंवा आॅक्टोबर २०१५मध्ये सुरू केला जाणार आहे. रत्नागिरीसह राज्यातील २० जिल्हा रुग्णालयांना याचा लाभ होणार आहे. राज्यभरातील ३४ पैकी १४ जिल्हा रुग्णालयांमध्ये वैद्यकीय महाविद्यालये आहेत. कोल्हापूर, सांगली, पुणे, औरंगाबाद, लातूर, नागपूर, अमरावती, नांदेड, धुळे आदी जिल्हा रुग्णालयांमध्ये वैद्यकीय महाविद्यालये आहेत. मात्र, उर्वरित २० जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालये नाहीत. त्यातील अनेक जिल्हा रुग्णालयांत वैद्यकीय महाविद्यालये प्रस्तावित आहेत. परंतु अद्याप त्यांचे प्रस्ताव पुढे सरकलेले नाहीत. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातही वैद्यकीय महाविद्यालय होणार असल्याच्या राजकीय घोषणा झाल्या. त्यासाठी पाहणीही झाली. परंतु अद्यापही याबाबत कार्यवाही झाली नाही. रत्नागिरी जिल्हा रुग्णालय तसेच तालुकापातळीवर असलेली रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये यामध्ये अनेक प्रथम श्रेणी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. शासकीय सेवेत येण्यास डॉक्टर्स तयार होत नाहीत. ग्रामीण भागात येण्याचीही त्यांची तयारी नसते. याचा फटका रत्नागिरीसह अनेक जिल्हा रुग्णालयांना काही वर्षात बसला आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. परिणामी रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर एम.बी.बी. एस. पदवी घेतलेल्यांसाठी रुग्णालयांमध्ये शासनाने पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात या अभ्यासक्रमासाठी जे तीन पदव्युत्तर पदविका घेतलेले वैद्यकीय अधिकारी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत, त्यामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक व बालरोगतज्ज्ञ डॉ. आरसुळकर, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पी. एस. चव्हाण, भूलतज्ज्ञ डॉ. पी. पी. काजवे यांचा समावेश आहे. परीक्षा शासकीय निकषांनुसारचएम.बी.बी.एस. होऊन ज्यांना पदव्युत्तर पदविका सुविधा उपलब्ध नाही, अशा एम.बी.बी.एस. पदवीधारकांना जिल्हा रुग्णालयातील या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येईल. या अभ्यासक्रमाची शासकीय निर्देशानुसार शासनस्तरावर परीक्षा होणार आहे. तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या डॉक्टर्सना काही काळ शासकीय सेवेत घेतले जाणार आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयांनाही प्रशिक्षित डॉक्टर्स उपलब्ध होतील, असा यामागील उद्देश आहे.या अभ्यासक्रमासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात तीन पदव्युुत्तर पदविका घेतलेले व दहा वर्षांचा अनुभव असलेले वैद्यकीय अधिकारी शिक्षक म्हणून काम पाहणार आहेत, तर पाच वर्षांचा अनुभव असलेले पदव्युत्तर पदविका घेतलेले तीन उपशिक्षकही कार्यरत होणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वीच पाठविण्यात आला होता. त्यातील काही त्रुटींची पूर्तता करून हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.-डॉ. बाळासाहेब आरसूळकर, जिल्हा शल्यचिकित्सक, रत्नागिरी जिल्हा रुग्णालय.