सिंधुदुर्गात ४८ तासात मुसळधार पाऊसाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 18:05 IST2017-09-06T17:44:41+5:302017-09-06T18:05:58+5:30
मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाकडून मिळालेल्या पूर्वसूचनेनुसार येत्या ४८ तासांत गडगडाटासह मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सिंधुदुर्गात ४८ तासात मुसळधार पाऊसाची शक्यता
ठळक मुद्दे १0 सप्टेंबरपासून गडगडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यताआवश्यक ती खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकाºयांचे आवाहन या कालावधीत वीज पडण्याची देखील शक्यता
सिंधुदुर्गनगरी दि.0६ : मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाकडून मिळालेल्या पूर्वसूचनेनुसार येत्या ४८ तासांत गडगडाटासह मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
या कालावधीत वीज पडण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आलेली आहे. दि. १0 सप्टेंबर २0१७ पासून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाºयांनी केले आहे.