Possession of high speed stroller fishing boats in the Malvan Sea; Fisheries operations | मालवण समुद्रातील कर्नाटकाची मासेमारी नौका ताब्यात; मत्स्य विभागाची धडक कारवाई 

मालवण समुद्रातील कर्नाटकाची मासेमारी नौका ताब्यात; मत्स्य विभागाची धडक कारवाई 

मालवण: कर्नाटकचा हायस्पीड ट्रॉलर (मासेमारी नौका) मालवण समुद्रात अनधिकृतपणे मासेमारी करताना आढळला आहे. मत्स्य विभागाच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले आहे. खोल समुद्रात २१ वावामध्ये थरारक पाठलाग करून ही कारवाई करण्यात आली.

सहाय्यक मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त यांच्या आदेशानुसार मालवण परवाना अधिकारी शिवराज चव्हाण, पोलीस कर्मचारी भोसले यांच्या पथकाने गुरुवारी ही कारवाई केली. तसेच ट्रॉलर ताब्यात घेऊन मालवण किनारी आणण्यात आला आहे. या ट्रॉलरवर म्हाकुल, वाघळी जातीची मच्छी आढळली आहे.

Web Title: Possession of high speed stroller fishing boats in the Malvan Sea; Fisheries operations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.