शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: वैभववाडीत पोलिसाने राहत्या घरी संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 17:07 IST

वैभववाडी : वैभववाडी पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई अनिल गोविंद शेटे (४०, मूळ गाव कोडोली ता.पन्हाळा, जि कोल्हापूर) यांनी शहरातील ...

वैभववाडी : वैभववाडीपोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई अनिल गोविंद शेटे (४०, मूळ गाव कोडोली ता.पन्हाळा, जि कोल्हापूर) यांनी शहरातील राहत्या घरी ओढणीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. त्यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती. त्यातूनच त्यांनी हे पाऊल उचलले असण्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.अनिल शेटे हे गेल्या काही वर्षांपासून वैभववाडी पोलिस ठाणे येथे सेवा बजावत होते. मध्यंतरी विजयदुर्ग पोलिस ठाण्यात बदली झाली होती. त्यानंतर, ते पुन्हा वैभववाडी स्थानकात बदलून आले होते. शहरातील एका गृहसंकुलात ते कुटुंबासह राहत होते. मात्र, त्यांची गेल्या काही दिवसांपासून मानसिक स्थिती ठीक नव्हती. त्यांच्यावर मानसिक उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वीच ते उपचारासाठी कोल्हापूरला जाऊन आले होते.गुरुवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे त्यांची पत्नी स्वयंपाक घरात जेवण बनवत होती. त्यावेळी अनिल हे बेडरूममध्ये होते. बराच वेळ ते खोलीमधून बाहेर आले नाहीत. त्यामुळे पत्नीने त्याना हाक मारली, परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पत्नीने खिडकीतून डोकावून पाहिले, तेव्हा पती पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले.

पत्नीने आरडाओरड केल्यानंतर शेजारच्यांनी धाव घेऊन पोलिसांना माहिती दिल्यानंतर, पोलिसांनी तत्काळ धाव घेत दरवाजा तोडून त्यांना खाली उतरविले. त्यानंतर, तत्काळ वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, वडील, आई असा परिवार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गvaibhavwadiवैभववाडीPoliceपोलिस