शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस बळाचा वापर करून बांधकामे पाडल्यास आत्मदहन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 15:41 IST

highway Kankavli sindhudurg- महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत महामार्गाच्या हद्दीत येणारी बांधकामे पोलीस बळाचा वापर करून पाडण्याचा प्रयत्न केल्यास आत्मदहन करू, असा इशारा कणकवली तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी दिला आहे. त्याबाबतचे पत्र त्यांनी तहसीलदारांना दिले.

ठळक मुद्देपोलीस बळाचा वापर करून बांधकामे पाडल्यास आत्मदहन करणार प्रदीप मांजरेकर यांचा इशारा : कणकवली तहसीलदारांना दिले पत्र

कणकवली : महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत महामार्गाच्या हद्दीत येणारी बांधकामे पोलीस बळाचा वापर करून पाडण्याचा प्रयत्न केल्यास आत्मदहन करू, असा इशारा कणकवली तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी दिला आहे. त्याबाबतचे पत्र त्यांनी तहसीलदारांना दिले.कणकवली शहरात महामार्ग चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्या अनुषंगाने महामार्गाच्या हद्दीत येणारी बांधकामे सोमवार, १५ फेब्रुवारीपासून तोडण्यात येणार आहेत. परंतु काही बांधकामांची प्रकरणे लवादाकडे प्रलंबित आहेत. महामार्ग अधिकाऱ्यांना वारंवार फोनवरून सूचना देऊनही वकिलामार्फत आपले म्हणणे न्यायालयासमोर मांडण्याचे सौजन्यही ते दाखवित नाहीत व फोन केला तर संवाद साधत नाहीत. एका बाजूने लोकांना मोबदल्यापासून वंचित ठेवायचे व दुसऱ्या बाजूने पोलिसी बळ, धाकदपटशा दाखवून आपले काम बेकायदेशीर मार्गाने चालू ठेवायचे असा प्रकार चालू आहे, असे मांजरेकर म्हणाले.या मोहिमेवेळी जर अन्याय होणार असेल तर आमच्याकडे आत्मदहन करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. या अगोदर उपोषण केले होते. तरीही प्रशासनाकडून फारसे प्रयत्न झालेले दिसून येत नाहीत. या मोहिमेमुळे काही विपरीत घडल्यास त्याला महामार्ग प्राधिकरण, कार्यकारी अभियंता सलीम शेख, उपअभियंता मणेर, महसूल यंत्रणा, पोलीस यंत्रणा जबाबदार असेल याची नोंद घ्यावी, असा इशाराही मांजरेकर यांनी दिला आहे.बांधकामांबाबतचे खटले लवादाकडे अजूनही प्रलंबितमहामार्गालगतच्या बांधकामांच्या निवाड्याबाबतचे खटले लवादाकडे ३ वर्षे प्रलंबित आहेत. त्यावर कोणताही निकाल मिळत नाही, अशी परिस्थिती आहे.आजपर्यंत प्रकल्पग्रस्तांनी शासनाला भरपूर सहकार्य केले; पण आता मोबदला न देता जर दांडगाईने पोलिसी बळाचा वापर करून बेकायदेशीररित्या बांधकामे पाडली जाणार असतील तर त्याला आमचा विरोध राहील, असेही प्रदीप मांजरेकर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :highwayमहामार्गKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग