कणकवलीत अपहरण प्रकरणी एकजण ताब्यात -- पोलिसांनी केली कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 05:27 PM2019-11-25T17:27:24+5:302019-11-25T17:29:57+5:30

अल्पवयीन मुलीच्या आईने या घटनेबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार हळवल येथे कामाला  असलेला व त्या मुलीच्या घरासमोरील घरात भाड्याने राहणाºया मायाप्पा हेडगे (रा. ममदापूर, गोकार्क, कर्नाटक) याला पोलिसांनी कर्नाटक येथून ताब्यात घेतले आहे.

Police take action against one in Kankavali abduction case | कणकवलीत अपहरण प्रकरणी एकजण ताब्यात -- पोलिसांनी केली कारवाई

कणकवलीत अपहरण प्रकरणी एकजण ताब्यात -- पोलिसांनी केली कारवाई

Next
ठळक मुद्देशोध घेऊन कर्नाटक येथून त्या युवकाला व मुलीला कणकवली पोलीस ठाण्यात आणले.

कणकवली : कणकवली शिवशक्तीनगर येथील एका पंधरा वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली होती.  याबाबत त्या मुलीच्या आईने कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाºया त्या युवकास कर्नाटक येथून ताब्यात घेतले आहे.

अल्पवयीन मुलीच्या आईने या घटनेबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार हळवल येथे कामाला  असलेला व त्या मुलीच्या घरासमोरील घरात भाड्याने राहणाºया मायाप्पा हेडगे (रा. ममदापूर, गोकार्क, कर्नाटक) याला पोलिसांनी कर्नाटक येथून ताब्यात घेतले आहे.

१४ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता मैत्रिणीजवळ जाते असे सांगून ती मुलगी घराबाहेर पडली होती. ती पुन्हा घरी आली नाही. तसेच शोधाशोध करूनही ती सापडली नव्हती.

त्यामुळे संशयित मायाप्पा हेगडे  यानेच तिला फूस लावून पळवून नेल्याचा संशय त्या मुलीच्या आईने तक्रारीत व्यक्त केला होता.  त्यामुळे मायाप्पा हेगडेवर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.  या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कदम करीत होते. त्यांनी शोध घेऊन कर्नाटक येथून त्या युवकाला व मुलीला कणकवली पोलीस ठाण्यात आणले.

मात्र, ती मुलगी आपल्या घरी जायला तयार नसल्याने तिला सावंतवाडी येथील बाल सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Police take action against one in Kankavali abduction case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.