शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

Sindhudurg- मिठबांवच्या तरुणाचा खून: अवघ्या १२ तासात पोलिसांनी लावला छडा, संशयित ताब्यात 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 19, 2023 15:36 IST

देवगड : मिठबांव येथे राहणारा प्रसाद परशुराम लोके (३१) याचा मुणगे मसवी रस्त्यावर काल, सोमवारी (दि.१८) पहाटे रक्ताच्या थारोळयात ...

देवगड : मिठबांव येथे राहणारा प्रसाद परशुराम लोके (३१) याचा मुणगे मसवी रस्त्यावर काल, सोमवारी (दि.१८) पहाटे रक्ताच्या थारोळयात मृतदेह आढळला होता. यावेळी त्याच्या गाडीची तोडफोड केल्याचे दिसून आले होते.  घटनेची माहिती प्राप्त होताच देवगड पोलिस ठाणे, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाचा संपुर्ण अभ्यास करण्यात आला. फॉरेन्सीक टीम व डॉगस्कॉड यांना पाचारण करून आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी प्रसाद याच्या मोबाईल लोकेशन वरून अवघ्या बारा तासांत या प्रकरणाचा छडा लावून मालवण कुंभारमाठ येथील संशयितास ताब्यात घेतले. संशयिताने गुन्हा कबूल केला आहे.मृत प्रसाद याने मिठबांव ते मुणगे मसवी या रत्याने प्रवास केलेला प्रथम दर्शनी निदर्शनास आल्याने या मार्गावरील शासकीय तसेच खाजगी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. परंतु त्यामध्ये कोणतेही संशयास्पद वाहन मृताच्या वाहनाचे पुढे किंवा पाठीमागे येता दिसले नाही. मृताचा मोबाईल घटनास्थळावर मिळून आलेला नव्हता. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सायबर पोलिस ठाण्याच्या मदतीने लोके याच्या मोबाईल ट्रक करण्यात आला.कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने किशोर परशुराम पवार, (रा. कुंभारमाठ, ता. मालवण) याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्याचा गुन्हयातील सहभाग स्पष्ट झाल्याने देवगड पोलीस ठाण्याने त्यास अटक केली.  गुन्हयाचा पुढील तपास देवगड पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे हे करीत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी  के. एल. सावंत यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र घाग, पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, सहा. पोलिस उप निरीक्षक गुरुनाथ कोयंडे, पोलिस हेडकॉन्स्टेबल राजु जामसंडेकर, आशिष गंगावणे, प्रमोद काळसेकर, किरण देसाई, पोलिस नाईक आशिष जामदार, पोलिस कॉन्स्टेबल यश आरमारकर तसेच सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर, पोलिस कॉन्स्टेबल प्रथमेश गावडे व ओ. टी. बी. पथकाचे पोलिस कॉन्स्टेबल रवि इंगळे यांनी हा गुन्हा उघडकीस आणला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस