शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

पोलीस अधिकारी सुनील धनावडे यांना राष्ट्रपती पदक; उत्कृष्ट सेवेबद्दल सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 7:46 PM

पुढे काही काळ ते उच्च पदस्थ व्यक्तींच्या सुरक्षेसाठीच्या स्पेशल प्रोटेक्शन युनिटमध्ये कार्यरत होते.

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांना आज उत्कृष्ट सेवेबद्दल मानाचे राष्ट्रपती पदक जाहीर झाले. धनावडे यांचा जिल्ह्यात सलग तीन वर्षे उत्कृष्ट सेवेबद्दल गौरव होत आहे. धनावडे हे बीकॉम एलएलबी आहेत. 1991 मध्ये थेट भरतीत ते पोलिस उपनिरीक्षक झाले. प्रशिक्षणानंतर त्यांनी नागपूरसह विदर्भात काम केले. पुढे काही काळ ते उच्च पदस्थ व्यक्तींच्या सुरक्षेसाठीच्या स्पेशल प्रोटेक्शन युनिटमध्ये कार्यरत होते. 2010ला पोलीस निरीक्षक म्हणून त्यांना बढती मिळाली. 18 वर्षे त्यांनी ठाणे पोलीस विभागात काम केले. यात उल्हासनगर, महात्मा फुले पोलीस स्टेशन या दोन ठिकाणी निरीक्षक, अतिरिक्त पोलीस आयुक्त ठाणे यांचे रिडर याशिवाय कोसोवो व साऊथ सुदान-2 युनायटेड नेशन-मिशनमध्येही त्यांनी काहीकाळ सेवा बजावली.1 जून 2017 ला ते सिंधुदुर्गात सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक म्हणून रुजू झाले. या काळात गडहिंग्लज येथील शिक्षकाचे खून प्रकरण, साखर लूट प्रकरण आदीमध्ये उत्कृष्ट तपास करत गुन्हेगारांना पकडले. सावंतवाडी कारागृहातील कैदी मृत्यूप्रकरणी सूक्ष्म तपास करत तत्कालीन कारागृह अधीक्षक व त्याच्या साथीदारावर स्वतः फिर्याद दिली. इतरही अनेक गुन्ह्यांचा तपास लावला. 3 मार्चपासून ते स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना याआधी कोसोवो व साऊथ सुदान-2 युनायटेड नेशन-मिशनमध्ये उत्कृष्ट सेवेबद्दल दोन पदके, 2018 मध्ये केंद्राकडून उत्कृष्ट तपास अधिकारी पुरस्कार, 2019 मध्ये पोलीस महासंचालक पदक आणि आता एकूण कारकिर्दीचा विचार करून मानाचे राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.