शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधिकाऱ्याकडून वाहतूक पोलिसाला मारहाण

By admin | Updated: November 7, 2014 23:40 IST

पोलीस खात्याची अब्रू चव्हाट्यावर आली.. वरिष्ठ त्यांच्यावर कोणती कारवाई करतात याकडे लक्ष

वैभववाडी : पोलीस पाटलाने निवृत्तीनिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत चक्क पोलीस अधिकाऱ्याने वाहतूक पोलिसाला रस्त्यावर लोळवून मारले. भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे काहीकाळ तळेरे- वैभववाडी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. बुधवारी रात्री झालेल्या या तमाशामुळे पोलीस खात्याची अब्रू चव्हाट्यावर आली असून वरिष्ठ त्यांच्यावर कोणती कारवाई करतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.पोलीस ठाण्यात सर्वाधिक उठबस असलेल्या लगतच्या गावातील पोलीस पाटील सेवानिवृत्त झाला. त्याने निवडक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी शहरापासून दोन किलोमीटर अंतरावरील आपल्याच गावात असलेल्या हॉटेलमध्ये जंगी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत तीन पोलीस अधिकारी आणि वाहतूक पोलिसासह काही अन्य पोलीस कर्मचारी सहभागी होते. पार्टी रंगात येत असताना एका अधिकाऱ्याचा ‘ग्लास’ पडल्याने वाहतूक पोलीस काहीतरी पुटपुटला.वाहतूक पोलिसाच्या पुटपुटण्याचा राग आल्यामुळे त्या अधिकाऱ्याने वाहतूक पोलिसाला हॉटेल समोरील रस्त्यावर मारहाण केली. त्या अधिकाऱ्याला बाहेरून आलेल्या दुसऱ्या अधिकाऱ्यानेही चोख साथ दिली. रात्री १० वाजण्याच्या सुमारास भर रस्त्यावर हा कायद्याच्या रक्षकांचा तमाशा सुरू होता. त्यामुळे तळेरे-वैभववाडी मार्गावरील वाहतूकही काहीकाळ ठप्प झाली होती. या हाणामारीत वाहतूक पोलिसाचा युनिफॉर्म फाटला आणि पट्ट्याचे बक्कलही तुटले.युनिफॉर्मवरील वाहतूक पोलिसाला मारहाण सुरू असल्याचे पाहून दोन्ही बाजूला थांबलेल्या वाहनांमधील लोक त्याला सोडविण्यासाठी सरसावले. मात्र पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये रंगलेला तमाशा पाहून सगळेच थबकले. कायद्याच्या रक्षकांनीच जबाबदारीच्या जाणीवेचे भान हरपून खुलेआम केलेल्या तमाशाची गेले दोन दिवस तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, पोलीस या घटनेबाबत भाष्य टाळून कानावर हात ठेवत आहेत. भर रस्त्यातील तमाशामुळे निवृत्त पोलीस पाटलाच्या पार्टीचा बेरंग तर झालाच त्याचबरोबर पोलीस खात्याची बेअब्रू झाली आहे. त्यामुळे ‘खात्या’ची माणसे म्हणून वरिष्ठ अधिकारी या घटनेवर पांघरूण टाकतात की नियमानुसार कारवाई करणार याचे साऱ्यांना औत्सुक्य आहे. सामान्य जनतेला कायद्याचा धाक दाखविणाऱ्यांनीच कायदा मोडल्याने खात्याच्या प्रतिमेविषयी जनतेला शंका निर्माण होऊ लागलीआहे. (प्रतिनिधी)