शहरं
Join us  
Trending Stories
1
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
2
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
3
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
4
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
5
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
6
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
7
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
8
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
9
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
10
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
11
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
12
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
13
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
14
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
15
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
16
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
17
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
18
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
19
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
20
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला: पोलिस तपासात समोर आली 'अशी' माहिती

By अनंत खं.जाधव | Updated: October 31, 2024 16:33 IST

सावंतवाडी : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात भाजपमधून बंडखोरी करत उभे ठाकलेले विशाल परब यांच्या वाहनावर अज्ञाताकडून ...

सावंतवाडी : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात भाजपमधून बंडखोरी करत उभे ठाकलेले विशाल परब यांच्या वाहनावर अज्ञाताकडून हल्ला झाल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनेचा सखोल तपास केला असता संशयित तरुण वेडसर असून त्याने कोणत्याही गाडीवर हल्ला केला नसल्याचे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी स्पष्ट केले. सखोल चौकशी करून त्याला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. तो कणकवली येथील चिरेखाणीत कामाला आहे.परब यांच्या गाडीवर झालेल्या हल्ला झाला असे वृत्त सर्वत्र पसरताच खळबळ उडाली. मात्र मुळात हा हल्ला नसून कणकवलीकडे जाण्यासाठी वाहन थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिरेखाण कामगाराला हल्लेखोर म्हणून बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार सहानुभूतीसाठी करण्यात आला का की अन्य काही याचा पोलिस शोध घेत आहेत. परब हे  सावंतवाडीच्या दिशेने परतत असताना मळगाव रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यावर एका परप्रांतीय व्यक्तीने गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार बुधवारी रात्री परब यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली अन् संशयित आरोपीला ताब्यात घेत चौकशी केली. यावेळी संशयित तरूण संजय गोप हा कणकवली येथील विरण गावातील चिरेखणीमध्ये कामाला आहे तो झारखंड रांची येथून मंगळवारी निघाला. त्याच्या सोबत विनोद गोप हा नातेवाईक होता. संजय हा सावंतवाडी रेल्वे स्थानक येथे लघु शंकेसाठी उतरला अन् रेल्वे चुकली. जवळ पैसे नसल्याने तो रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांना हात दाखवून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या हातात काठी होती.दरम्यान, निरवडे मळगाव रस्त्यावरून अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्या गाड्या जात होत्या. या गाड्या थांबवण्याचा प्रयत्न संजयने केला. गाडी थांबल्यावर त्या गाडीतून काही माणसे उतरल्यावर त्याने घाबरून पळ काढला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांकडून तातडीने तपास करीत संशयित तरुणास ताब्यात घेतले. चौकशीसाठी विनोद गोप याला कणकवलीमधून आणण्यात आले. त्यावेळी हा तरूण थोडा वेडसर असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी सर्व घटनेचा लेखी जबाब नोंदवून या तरूणाला सोडून दिले. पोलिसांनी तपासाची माहिती विशाल परब यांना ही दिली. त्यांनीही पोलिस तपासावर कोणतेही प्रश्न चिन्ह उभे केले नाही.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sawantwadi-acसावंतवाडीthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024