शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस वसाहत निवासस्थाने मोडकळीस

By admin | Updated: November 9, 2014 23:34 IST

मालवणातील स्थिती : राजकीय अनास्थेमुळे कर्मचारी वंचित

मालवण : येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या शासकीय वसाहतीतील निवासस्थाने मोडकळीस आली आहेत. यातील काही निवासस्थाने ४० ते ४५ वर्षांपूर्वीची आहेत. या इमारतींची दुरूस्ती न झाल्याने त्या जुनाट झाल्या आहेत. नादुरूस्त इमारती मोकाट जनावरे व कुत्र्यांचे वस्तीस्थान बनली आहेत. वसाहतींच्या दुरवस्थेमुळे पोलीस कर्मचाऱ्यांना इतरत्र भाड्याने खोल्या घेऊन रहावे लागत आहे. सीआरझेडची बंधने आणि राजकीय अनास्थेमुळे पोलीस कर्मचाऱ्यांना हक्काच्या वसाहतीपासून वंचित रहावे लागत आहे.मालवण शहरात रॉक गार्डनसारख्या पर्यटन स्थळानजिकच तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन व न्यायालयाची इमारत आहे. याला लागूनच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी निवासी वसाहत बांधण्यात आली आहे. यातील १० खोल्यांचे बांधकाम १९७० ते ७५च्या दरम्यान करण्यात आले आहे. एकूण २२ खोल्या या ठिकाणी बांधण्यात आल्या होत्या. बांधकामानंतर काही वर्षे या वसाहतीची सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत किरकोळ दुरूस्ती करण्यात येत होती. मात्र, १०-१२ वर्षांपासून या इमारतींची देखभाल दुरूस्ती झालेली नाही. यानंतर याच ठिकाणी २२ खोल्या बांधण्यात आल्या. याही वसाहती देखभालीच्या प्रतीक्षेत आहेत. पोलीस स्थानकाला लागूनच वसाहत असल्याने पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी निवासस्थानांसाठी ही सोयीस्कर आहे. या वसाहतीची दुरूस्ती न झाल्याने या इमारती मोडकळीस आल्या आहेत. २२ पैकी १६ खोल्या मोठ्या प्रमाणावर मोडकळीस आल्या आहेत. अधिकारी आणि कर्मचारी मिळून ६५ जण फक्त २२ खोल्यामध्ये राहत आहेत. वसाहतीमधील विहिरीचीही डागडुजी झालेली नसल्याने तिची दुरवस्था झाली आहे. पावसाळ््यात येथील जवळपास सर्वच इमारतींना गळती लागल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना राहणे मुश्किल झाले होते.या इमारत दुरूस्तीसाठी अथवा नव्याने बांधकाम करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. सीआरझेडमुळे या इमारतींची दुरूस्ती व बांधकाम रेंगाळले आहे. मात्र, शासन खास बाब म्हणून पोलीस वसाहतीचे काम हाती घेऊ शकते. यापूर्वी सीआरझेडचे निर्बंध असतानाही तारकर्ली पर्यटन केंद्रातील इमारतींना शासनाने खास बाब म्हणून परवानगी दिली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीची अनेकदा माजी पालकमंत्री नारायण राणे यांनी पाहणी करून बांधकाम विभागाला दुरूस्ती अथवा संकुल उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, अद्यापही तसे प्रयत्न बांधकाम विभागाने केल्याचे दिसत नाही. (प्रतिनिधी)