“प्लाय् ९१” विमान कंपनीची सिंधुदुर्ग ते बंगळुरू सेवा सुरु, सिंधुदुर्ग विमानतळावरून ७५ सीट असलेल पहिलं विमान रवाना 

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: March 18, 2024 04:12 PM2024-03-18T16:12:51+5:302024-03-18T16:13:32+5:30

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग विमानतळावरून “प्लाय् ९१” विमानकंपनीची सिंधुदुर्ग ते बंगळुरू सेवा आजपासून सुरु झाली. ७५ सीट असलेल पहिल विमान ...

Ply 91 airline starts service from Sindhudurg to Bangalore, first flight with 75 seats departs from Sindhudurg airport | “प्लाय् ९१” विमान कंपनीची सिंधुदुर्ग ते बंगळुरू सेवा सुरु, सिंधुदुर्ग विमानतळावरून ७५ सीट असलेल पहिलं विमान रवाना 

“प्लाय् ९१” विमान कंपनीची सिंधुदुर्ग ते बंगळुरू सेवा सुरु, सिंधुदुर्ग विमानतळावरून ७५ सीट असलेल पहिलं विमान रवाना 

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गविमानतळावरून “प्लाय् ९१” विमानकंपनीची सिंधुदुर्ग ते बंगळुरू सेवा आजपासून सुरु झाली. ७५ सीट असलेल पहिल विमान आज सोमवारी १.१५ मिनिटांनी सुटले. या नूतन सेवेचे उद्घाटन माजी सभापती निलेश सामंत, प्लाय् ९१ कंपनीचे व्यवस्थापक मनोज चाको, आशुतोष चिटणीस, आय.आर बि. कंपनीच कुलदीपसिंग, परूळेबाजार सरपंच प्रणिती आंबडपालकर, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, प्रसाद पाटकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

सिंधुदुर्ग विमानतळावरून फ्लाय ९१ ही विमान कंपनीने पहिल्या टप्यात हैद्राबाद व बंगळूरू अशी सेवा सुरु करत आहे. या विमान कंपनीला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने नुकतीच प्रवाशी वाहतूकीची परवानगी दिली आहे. २ मार्च रोजी गोवा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळा वरुण बंगळूर कडे विमावाने उड्डाण करून शुभारंभ केला आहे. व्यावसायिक उड्डाणासाठी जी, परवानगी आवश्यक असते ती कंपनीला एप्रिल २०२३ मध्येच मिळाली आहे.

नवीन विमान कंपनी ही मूळची गोव्यातील आहे. कंपनीने परवानगीच्या सर्व परिक्षा दिल्या आहेत व पूर्ण केल्या आहेत. शासनाच्या उडाण योजनेत काही मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. यात महाराष्ट्रातील जळगाव, नांदेड, सह सिंधुदुर्गचाही समावेश आहे. त्यामुळे आज पासून सिंधदुर्ग विमानतळावरुन सेवा सुरू झाली आहे. तसेच हि कंपनी पर्यटकांसाठीही विशेष विमानसेवा चालवणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अशाच प्रकारे विमान कंपनीची नियमित सिंधुदुर्ग विमानतळावरून सेवा सुरू झाल्यानंतर या विमानतळाचे महत्त्व अजून वाढणार आहे.

सिंधुदुर्ग ते बंगळुरू प्रवास करा फक्त १९९१/- रुपयात bharat unbond या अंतर्गत कनेक्टिंग बंगळुरू, गोवा, हैद्राबाद, सिंधुदुर्ग अशी टॅग लाईन या विमान कंपनीने केली आहे. दरम्यान गेले काही महिने सिंधुदुर्ग विमानतळावरून चांगली विमान सेवा मिळत नाही या कारणाने प्रवाशांची नाराजी होती. मात्र या नव्या कंपनीच्या विमानसेवेमुळे पुन्हा एकदा प्रवासी या विमानतळाशी जोडले जाणार आहेत. आजच्या या उद्घाटन वेळी प्रकाश राणे, बाळा राऊळ, उपसरपंच संजय दुधवडकर, राणे, करलकर, आदी उपस्थित होते.

Web Title: Ply 91 airline starts service from Sindhudurg to Bangalore, first flight with 75 seats departs from Sindhudurg airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.