शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : तहसीलच्या अभिलेख कक्षाला गळती, साडेचार लाख कागदपत्रांवर प्लास्टिकचे आच्छादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 17:17 IST

वैभववाडी तालुक्याचा महसुली दस्तऐवज ठेवलेल्या तहसील कार्यालयाच्या अभिलेख कक्षाला गळती लागली आहे. त्यामुळेच सुमारे साडेचार लाख कागदपत्रे प्लास्टिकने झाकून ठेवण्यात आली असून त्याच गळतीत कागदपत्राच्या संगणकीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे या किंमती महसुली दस्तऐवजाच्या भवितव्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

ठळक मुद्देसाडेचार लाख कागदपत्रांवर प्लास्टिकचे आच्छादन तहसीलच्या अभिलेख कक्षाला गळती, तीन वर्षे पत्रव्यवहार

वैभववाडी : तालुक्याचा महसुली दस्तऐवज ठेवलेल्या तहसील कार्यालयाच्या अभिलेख कक्षाला गळती लागली आहे. त्यामुळेच सुमारे साडेचार लाख कागदपत्रे प्लास्टिकने झाकून ठेवण्यात आली असून त्याच गळतीत कागदपत्राच्या संगणकीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे या किंमती महसुली दस्तऐवजाच्या भवितव्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

या इमारतीच्या गळतीबाबत तीन वर्षे पत्रव्यवहार करुनही सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष द्यायला तयार नसल्याची खंत तहसीलदार संतोष जाधव यांनी व्यक्त केली.जुने सातबारा, ८ अ, हक्क नोंदणी उतारा, इनामदार पत्रके, जन्म मृत्यू रजिस्टर, कुळ रजिस्टर, जमाबंदी पत्रक, अकृषक परवाने, वाटप पत्रक आदी १९५४-५५ पासूनचे २५ प्रकारचे दस्तऐवज अभिलेख कक्षात ठेवण्यात आले आहेत. या सर्व कागदपत्रांची संख्या ४ लाख ३८ हजार इतकी आहे. अभिलेख कक्षातील या किंमती दस्तऐवजांचे संगणकीकरणाद्वारे अद्ययावतीकरण अद्याप सुरु आहे.अभिलेख कक्षात छताला सर्वत्र गळती लागली आहे. त्यामुळे संपूर्ण दस्तऐवजावर प्लास्टिकचे आच्छादन करण्यात आले आहे. त्या प्लास्टिकवरुन पाणी साचले आहे. त्यामुळे अभिलेख कक्षात दलदल निर्माण झाली आहे.छताची गळती आणि फरशीवरच्या दलदलीत बसून दस्तऐवजाच्या संगणकीकरणाचे काम सुरु असल्याने संगणक परिचालकांना त्रास होत आहे. परंतु, संपूर्ण वैभववाडी तालुक्याचा महसुली दस्तऐवज पाण्यात असताना त्याकडे कुणीही गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे या किंमती दस्तऐवजाचे भवितव्य धोक्यात आले आहे.सार्वजनिक बांधकामचे दुर्लक्ष : तहसीलदारअभिलेख कक्षाच्या छतावर पत्र्याची शेड उभारण्याबाबत गेले तीन वर्षे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार सुरु आहे. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे गळती सुरु होताच दस्तऐवजांचे पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी त्यावर प्लास्टिक घातले आहे.

आता पुन्हा बांधकामला स्मरणपत्र काढून जागे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे तहसीलदार संतोष जाधव यांनी सांगितले. 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागRainपाऊसTahasildarतहसीलदारsindhudurgसिंधुदुर्ग