बांधकामविरोधात वृक्षारोपणाचे अस्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 16:38 IST2017-09-27T16:31:55+5:302017-09-27T16:38:40+5:30
बेळगाव-सावंतवाडी या राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे अनेकांना अपघातांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील जिमखाना मित्रमंडळाच्यावतीने भररस्त्यातच वृक्षारोपण करण्यात आले.

बांधकामविरोधात वृक्षारोपणाचे अस्त्र
सावंतवाडी 27 : बेळगाव-सावंतवाडी या राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे अनेकांना अपघातांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील जिमखाना मित्रमंडळाच्यावतीने भररस्त्यातच वृक्षारोपण करण्यात आले.
रस्त्यात खड्डे पडले असून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. वारंवार लक्ष वेधूनही याबाबत कोणतीही भूमिका घेण्यात आली नाही. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दसºयापर्यंत खड्डे न बुजविल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा मित्रमंडळाचे अध्यक्ष अजित सांगेलकर यांनी दिला.
यावेळी उपाध्यक्ष अमित आसोलकर, सचिव सचिन केसरकर, खजिनदार नितीन सावंत, कार्याध्यक्ष महेश डोंगरे, कार्यसचिव संदीप इंगळे, जिमखान्यावरील ज्येष्ठ सदस्य विलास सावंत, अनिल आसोलकर, संदेश केसरकर, इरफान शेख, फैयाज मुजावर, शेखर बांदिवडेकर, गौरव केसरकर, गौरेश वाडकर, किरण गोंधळी, अमरेश आसोलकर, सचिन इंगळे, संदीप लाखे आदी उपस्थित होते.