शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

लेकींसाठीची योजना कागदावरच

By admin | Updated: May 15, 2015 23:34 IST

खेड तालुका : दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील पहिल्या दोन मुलींना होणार लाभ

खेड : सध्या मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत झपाट्याने कमी होत आहे. मुलीपेक्षा मुलांकडेच जास्त लक्ष दिले जाते. मुलींची सातत्याने कमी होत असलेली संख्या वाढवण्यासाठी व आता लेकींना सर्वार्थाने संरक्षण देण्यासाठी राज्य सरकार आता दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील पालकांच्या पहिल्या दोन मुलींना त्या सज्ञान झाल्यानंतर १ लाख रूपये देणार आहे. याकरिता राज्य सरकारने ‘सुकन्या’ नावाने आता नवा जागर मांडला असून, लवकरच त्याचे परिणाम दिसून येतील, अशी आशा महिलांमधून व्यक्त होऊ लागली आहे. मात्र, या योजनेची योग्य अंमलबजावणी न झाल्याने अपवाद वगळल्यास ही योजना केवळ कागदावर राहिली आहे.पालकांना विविध कारणांनी मुलीच्या भवितव्याची चिंता सतावत असते. अशातच पुरेशा आर्थिक स्थितीअभावी मुलींचे संगोपन करणे पालकांना जड जाते. याचा परिणाम मुलींच्या वैवाहीक जीवनात पदोपदी जाणवतो. सामाजिक परंपरा, रूढी, चालीरिती, गरिबी व अनिष्ठ प्रथा आदी कारणांमुळे बहुसंख्य पालकांना मुली नको असतात. यामुळे स्त्रीभ्रूण हत्या, जन्मानंतरची तिची हेळसांड, तिच्या संगोपनाकडे दुर्लक्ष, स्त्री शिक्षणाकडे कानाडोळा करणे आदी प्रकारांमुळे मुलींचे प्रमाण मुलांच्या तुलनेत कमी आहे.याकरिता मुलींची संख्या वाढवण्यासाठी राज्य सरकारने दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील पालकांसाठी १ जानेवारी २०१४पासून ‘सुकन्या योजना’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत यातील पहिल्या दोन मुलींच्या नावे २१ हजार २०० रूपये रक्कम १८ वर्षाकरिता जीवन विमा गुंतवणार आहे. याच गुंतवणुकीतून प्रत्येक मुलीला वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर १ लाख रूपये मिळणार आहेत.दोन मुलींच्या नावे विमा योेजनेत स्वतंत्र गुंतवणूक करण्यात येणार आहे. मात्र, हा लाभ १८ वर्षांनंतर मुलीला मिळणार आहे.यामुळे पालकांची चिंता काहीशी कमी झाली आहे. सरकारच्या या बहुआयामी निर्णयामुळे दारिद्र्यरेषेखालील पालकांनी मात्र सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ही योजना अधिक प्रभाविपणे राबविल्यास सावित्रीच्या लेकींना खराखुरा लाभ मिळण्यास मदतच होणार आहे. सध्यातरी या योजनेला कमी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. राज्यात हे अभियान अधिक गतीने राबविण्यासाठी जागृती होणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)लेकीच्या संरक्षणासाठी जागर...राज्य सरकारतर्फे सुकन्या नावाने योजना तयार करण्यात आली असून, सध्या मुलींची संख्या कमी होत असल्याने मुलींकडे जास्त लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. राज्य शासनातर्फे हे अभियान राबविले जात असून, ते यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याला साथ मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.