नितेश राणेंची दुटप्पी भूमिका जनतेला माहीत - संदेश पारकर 

By सुधीर राणे | Published: March 8, 2024 03:57 PM2024-03-08T15:57:17+5:302024-03-08T15:57:56+5:30

मुंबईस्थित चाकरमान्यांचा १३ मार्चला शिवसेना भवनात मेळावा

People know Nitesh Rane double role says Sandesh Parkar | नितेश राणेंची दुटप्पी भूमिका जनतेला माहीत - संदेश पारकर 

नितेश राणेंची दुटप्पी भूमिका जनतेला माहीत - संदेश पारकर 

कणकवली: भाजपच्यावतीने हिंदुत्वाची सगळीच जबाबदारी मीच घेतली आहे,असे नितेश राणे भासवत आहेत. त्यांचे हे सगळे मंत्रिपदासाठी नाटक आहे.त्यामुळेच त्यांच्याच वरवडे गावातून मुस्लिम समाजाने राणे यांच्यापासून फारकत घेतली आहे.जिल्ह्यात एक व जिल्ह्याबाहेर एक अशी दुटप्पी भूमिका ते घेत आहेत.हे सगळे जनता जाणून आहे.  अशी टीका शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केली.

कणकवली येथील विजय भवन येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, अनुप वारंग आदी उपस्थित होते.

संदेश पारकर म्हणाले, रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील निवडणूक प्रचाराबाबत कोकणातील मुंबईस्थित चाकरमान्यांचा मेळावा १३ मार्च रोजी मुंबई येथे शिवसेना भवन कार्यालयात सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. गुरुवारी राणेंच्या वरवडे गावातील मुस्लिम बांधवानी खासदार राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. खासदार राऊत यांच्या समोर उमेदवार कोण आहे ? हे अजून निश्चित नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे जरी लोकसभा निवडणुकीला उभे राहिले तरी कोणताही फरक पडणार नाही. 

लोक महागाईने त्रस्त झाले आहेत. त्यामुळे लोकांना आता केंद्रातील सत्तेत बदल आवश्यक आहे. नारायण राणे जर उमेदवार असतील तर ही निवडणूक एकतर्फी होवून विनायक राऊतच पुन्हा निवडून येतील असा विश्वास संदेश पारकर यांनी व्यक्त केला. 

सुशांत नाईक म्हणाले, आमच्या उमेदवारांची प्रचाराची सुरुवात झाली आहे. विनायक राऊतच पुन्हा निवडून येतील. त्यांना कणकवली विधानसभा मतदारसंघात देखील चांगले मताधिक्य असेल. विकास कामांच्या जोरावर विनायक राऊत निवडून येतील. 

Web Title: People know Nitesh Rane double role says Sandesh Parkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.