शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातून उध्दवसेनेला जनतेने हद्दपार केले, नितेश राणे यांचे टीकास्त्र

By सुधीर राणे | Updated: June 5, 2024 16:14 IST

काहीजणांचा हिशोब व्याजासहित चुकता करणार

कणकवली : गेल्या १० वर्षात विकास कामे न केल्याने विनायक राऊत यांना लोकांनी ठरवून घरी बसवले आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी गेली ४० वर्षे आपले सर्वस्व पणाला लावत सिंधुदुर्गवासियांची सेवा केली. त्यामुळे जनतेने मतदानाच्या रुपाने त्यांना आशिर्वाद दिले आहेत. तर येथील विकास करू शकणाऱ्या प्रकल्पांना कायम विरोध करणाऱ्या उध्दवसेनेला जनतेने कोकणातून हद्दपार केले आहे. असे सांगतानाच काहीजणांचे हिशोब चुकते करायचे असून आगामी काळात ते व्याजासहीत चुकते केले जातील असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. कणकवली येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राणे म्हणाले, आता रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभेत आपल्या हक्काचा खासदार निवडून आला आहे. गेल्या वर्षभरात भाजपाचे नेते सातत्याने सांगत होते. ते म्हणजे यापुढचा खासदार हा कमळ या चिन्हाचा असेल. कारण येथील जनतेने ठरवेल होते. विनायक राऊत यांना घरी बसवायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपले समर्थन देण्यासाठी जनतेने हा निकाल दिला आहे. त्यामुळे या मतदार संघातील लोकांचे आभार मानतो. दीपक केसरकर यांनी कृतीतून करुन दाखविले पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून पालक कसा असावा? हे समजते. एक नेतृत्व काय करु शकते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. भाजपा पक्ष आणि महायुती कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी काम केले. त्यामुळे यश प्राप्त झाले आहे. या निकालात मॅन ऑफ द मॅच देण्यासारखे काम शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी कृतीतून करुन दाखविले आहे. त्यांनी महायुतीचा धर्म पाळला. तसेच महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक आणि त्यांचा पक्ष आमच्या पाठीशी राहिला आहे. उद्धवसेनेच्या अदृश्य हातांचे आभार परंतु या निवडणूकीत काही कटू अनुभव आले. त्याची चर्चा महायुतीच्या बैठकीत होईल. महायुतीच्या नेत्यांनी उद्धवसेनेला  या मतदार संघात राजकीय शत्रू समजून काम केले पाहिजे. अन्यथा महायुतीकडे ताकद असून देखील पुढील निवडणुका अवघड जातील. उद्धवसेनेच्या अदृश्य हातांचे मी आभार मानतो, त्यांच्या  मदतीमुळे आमचा हा विजय सुकर झाला. बाळासाहेबांना मानणा-या शिवसैनिकांनी  राणेंना मदत केली. आता जिल्ह्यातील उद्धवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होते की पक्ष राहतो, हे यापुढे आम्हाला कळेलच.लोकसभेत या मतदार संघात ४२ हजारांचे लीड दिले त्याबद्दल समाधान व्यक्त करतो. उद्धव ठाकरे यांची कणकवलीत सभा झाली. त्यात आम्हाला त्यांनी शिव्या शाप दिले तेव्हाच मी सांगितले होते की, मतदार त्याचा वचपा काढतील. ते या निकालातून दिसून आले आहे. विधानसभा निवडणुकीत ३० हजाराचे लीड मला होते ते ४२ हजार झाले आहे. वैभव नाईकांचा पराभव अटळ!वैभव नाईक यांच्या मतदार संघात आम्हाला मिळालेल्या मताधिक्याने पुन्हा एकदा कुडाळ आणि मालवण मध्ये जनता राणे आणि भाजपच्या पाठीशी राहिली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांचा पराभव अटळ असल्यानचेही नितेश राणे यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गUddhav Thackerayउद्धव ठाकरेNitesh Raneनीतेश राणे BJPभाजपाShiv Senaशिवसेना