निवृत्तीवेतनवाहिनी १४ मे पर्र्यत बंद

By Admin | Updated: May 6, 2017 17:15 IST2017-05-06T17:15:47+5:302017-05-06T17:15:47+5:30

कोषवाहिनीत सुधारणा करण्याचे काम सुरु

Pensions closed on May 14 | निवृत्तीवेतनवाहिनी १४ मे पर्र्यत बंद

निवृत्तीवेतनवाहिनी १४ मे पर्र्यत बंद

 आॅनलाईन लोकमत

सिंधुदुर्गनगरी, दि. 0४ : वित्त विभागाच्या निवृत्तीवेतन वाहीनीसह बीम्स, ग्रास, सेवार्थ, बील पोर्टल, एनपीएस व कोषवाहिनीमध्ये सुधारणा करण्यासाठी दिनांक ६ मे २0१७ ते दिनांक १४ मे २0१७ या कालावधीत सर्व वाहिनी बंद ठेवण्यात येणार असल्याचे कळविलेले आहे. त्यामुळे या कालावधीत निवृत्तीवेतनवाहिनी बंद असल्यामुळे निवृत्तीवेतनधारकांची सर्व प्रकारची प्रदान करण्याची सुविधा बंद होणार आहे.

या कारणाने दिनांक ६ मे २0१७ ते १४ मे २0१७ या कालावधीत ओळख तपासणीसाठी कोषागार कार्यालयात उपस्थित राहणेबाबत सुचनापत्र प्राप्त झालेल्या सर्व निवृत्तीवेतनधारकांनी कोषागार कार्यालयात हजर राहू नये. त्यांना ओळखतपासणीसाठी पुढील तारीख कळविण्यात येईल यांची सर्व निवृत्तीवेतनधारकांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी यांनी केले आहे.

Web Title: Pensions closed on May 14