पावणेदोन लाखांची एडगाव येथे दारू पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 04:29 PM2020-02-12T16:29:30+5:302020-02-12T16:30:38+5:30

पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु ती गाडी गगनबावड्याच्या दिशेने सुसाट निघाली. पोलिसांनी त्या गाडीचा पाठलाग करून एडगाव तिठा येथे गाठले. झडती घेतली असता गाडीत खाकी रंगाचे खोके दिसून आले. त्यात गोवा बनावटीची दारू आढळून आली. ही माहिती पोलीस स्थानकात देताच

Pawneed Millions | पावणेदोन लाखांची एडगाव येथे दारू पकडली

वैभववाडी पोलिसांनी पाठलाग करून पकडलेल्या गाडीत पावणेदोन लाखांची दारू सापडली.

Next
ठळक मुद्देवैभववाडी पोलिसांनी पाठलाग करून पकडलेल्या गाडीत पावणेदोन लाखांची दारू सापडली.

वैभववाडी : कोकिसरे ते एडगाव तिठा असा पाठलाग करून पोलिसांनी पावणेदोन लाख रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू पकडली. दारुसह ३ लाख ३८ हजार ४० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. ही कारवाई मंगळवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी कारवाई करण्यात आलेल्या सांगलीतील दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तीन दिवसांतील पोलिसांची ही दुसरी कारवाई आहे.

गाडीतून दारु वाहतूक केल्याप्रकरणी अटक केलेल्यांमध्ये  जितेंद्र अशोक मोहिते (रा. पलुस सांगली), रोहित राजेंद्र कांबळे (रा. इस्लामपूर सांगली) या दोघांचा समावेश आहे.
पोलीस हवालदार अशोक सांवत आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद पाटील हे दोघे सोमवारी रात्री गस्तीवर होते. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्यांना कोकिसरे रेल्वेफाटकानजीक एक गाडी (क्रमांक-५३७१)  संशयास्पद दिसली.

पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु ती गाडी गगनबावड्याच्या दिशेने सुसाट निघाली. पोलिसांनी त्या गाडीचा पाठलाग करून एडगाव तिठा येथे गाठले. झडती घेतली असता गाडीत खाकी रंगाचे खोके दिसून आले. त्यात गोवा बनावटीची दारू आढळून आली. ही माहिती पोलीस स्थानकात देताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे, पोलीस राजेंद्र खेडकर, मारूती साखरे घटनास्थळी पोहोचले.त्यांनी गाडीतील त्या दोघांना ताब्यात घेतले.

गाडीमध्ये १ लाख ८३ हजार ४० रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या दारुचे २६ खोके होते. पोलिसांनी दारू, दीड लाख रुपये किमतीची गाडी व आठ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा ३ लाख ३८ हजार ४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दारू वाहतूक करणाºया दोन्ही संशयिताना कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

 

Web Title: Pawneed Millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.