पार्टीमध्ये सुरु होते अश्लील नृत्य, आंबोलीजवळ हॉटेलवर पोलिसांची धाड, ३४ जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 07:41 PM2021-11-23T19:41:04+5:302021-11-23T19:41:55+5:30

सावंतवाडी : आंबोली- चौकुळ येथील डार्क फॉरेस्ट रिट्रीट या हॉटेलवर कणकवली पोलीस उपअधीक्षक नितीन काटेकर याच्या पथकाने धाड टाकली. ...

The party starts with obscene dance, police raid hotel near Amboli, 34 arrested | पार्टीमध्ये सुरु होते अश्लील नृत्य, आंबोलीजवळ हॉटेलवर पोलिसांची धाड, ३४ जण ताब्यात

पार्टीमध्ये सुरु होते अश्लील नृत्य, आंबोलीजवळ हॉटेलवर पोलिसांची धाड, ३४ जण ताब्यात

googlenewsNext

सावंतवाडी : आंबोली- चौकुळ येथील डार्क फॉरेस्ट रिट्रीट या हॉटेलवर कणकवली पोलीस उपअधीक्षक नितीन काटेकर याच्या पथकाने धाड टाकली. या कारवाईत आंध्रप्रदेश व कर्नाटक येथील अॅग्रो कंपनीच्या 18 जणासह 9 युवती आणि हॉटेल मालकासह कामगार असे मिळून 34 जणांवर ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडू एकूण ४७ हजार ७५८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई काल, सोमवारी (दि.२२) रात्री उशिरा करण्यात आली. या कारवाई बाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. तसेच स्थानिक पोलिसांना कारवाई करण्यात आल्यानंतर माहिती देण्यात आली होती.

आंबोली चोकुळ मार्गावर डार्क फॉरेस्ट हे हॉटेल आहे. या हॉटेलवर आंध्रप्रदेश राज्यातील हैद्राबाद येथील अॅग्रो कंपनीचा माल वितरित करणाऱ्या डिस्ट्रीब्युटर याच्यासाठी पार्टी ठेवण्यात आली होती. मात्र या वितरकांकडून सोबत काही युवती ही आल्या होत्या. याठिकाणी अश्लील नृत्य तसेच कोरोनाचे नियमाचे उल्लंघन सुरु असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांना मिळाली. त्यानी ताबडतोब कणकवली पोलीस उपअधीक्षक नितीन काटेकर यांना कारवाईचे आदेश दिले.

या आदेशानुसाक पोलीस उपअधीक्षक नितीन काटेकर यांच्या पथकाने याठिकाणी धाडी टाकल्या. यावेळी याठिकाणी तरुण तरुणींचा धिंगाणा सुरु असल्याचे निर्दशनास आले. तसेच या हॉटेलला लॉजिग बोर्डिंग चा परवाना ही नव्हता. याप्रकणी पोलिसांनी 34 जणाना ताब्यात घेतले. तर हॉटेल मालकासह हॉटेल कामगारावर तसेच संबधितांवर गुन्हा दाखल केला. या पार्टीत कर्नाटक व हैद्राबाद येथील हे वितरक तसेच युवती असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कारवाईनंतर संबंधित सर्वाना आज, मंगळवारी सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी प्रत्येकाला साडेसात हजारचा रोख जामीन आणि त्याच रकमेच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्यात आले. मात्र दोन दिवसात जामीन देण्याचे आदेश न्यायालयाने यावेळी दिले आहेत.

Web Title: The party starts with obscene dance, police raid hotel near Amboli, 34 arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.