साप, विंचवांची खेडमध्ये दहशत

By Admin | Updated: June 3, 2015 23:38 IST2015-06-03T22:26:12+5:302015-06-03T23:38:04+5:30

ग्रामस्थ भयग्रस्त : तालुक्यात ९८९ विंचूदंश, तर १३१ सर्पदंशांची नोंद

Panic in snakes, scattered villages | साप, विंचवांची खेडमध्ये दहशत

साप, विंचवांची खेडमध्ये दहशत

खेड : तालुक्यातील विंचू आणि सर्पदंशाची नोंद हा चिंतेचा विषय झाला आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण जास्त असल्याने शासनाच्या सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये याची लस उपलब्ध असणे आवश्यक झाले आहे. मात्र, अनेकवेळा रूग्णांना या दंशावरील लस वेळेत उपलब्ध होत नसल्याने काही रूग्ण दगावल्याच्या घटना आहेत.२०१४-१५ या वर्षात तालुक्यात ९८९ जणांना विंचूदंश, तर १३१ जणांना सर्पदंश झाला. याशिवाय ७२३ जणांचा श्वानांनी चावा घेतल्याची नोंद झाली आहे. उपचाराअभावी काही वेळेला सर्पदंश आणि विंचूदंशाने रुग्ण मृत्यृमुखी पडल्याचे समोर आले आहे.सर्वाधिक नोंद लोटे प्राथमिक आरोग्य केंद्रात, तर सर्वाधिक कमी नोंद शिव आरोग्य केंद्रात झाली आहे. याबरोबरच भटके श्वान आणि सर्पदंशाचे प्रमाण चिंताजनक आहे. वर्षभरात ७२३ जणांना श्वानांनी चावा घेतल्याने त्यांच्यावर या केंद्रामध्ये उपचार करण्यात आले. यातील एकट्या कळंबणी उपजिल्हा रूग्णालयामध्ये ३०० श्वानदंश झालेल्या रूग्णांवरील उपचारांचा समावेश आहे.कळंबणी उपजिल्हा रूग्णालय हे महामार्गावर आणि खेडनजीक असल्याने अनेक रूग्णांना या रूग्णालयात दाखल करणे सुलभ होत असते. त्यामुळे या रूग्णालयात येणे पसंत करतात़ येथील रूग्णालयातील रूग्णांची संख्या इतर रूग्णालयांच्या तुलनेत मोठी आहे. याशिवाय सर्पदंश झालेल्यांची संख्या काहीशी कमी असल्याचे येथील वैद्यकीय अधिकारी सांगतात.या वर्षामध्ये १३१ लोकांना सर्पदंश झाला. त्यांच्यावर ८ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार करण्यात आले. काही आरोग्य केंद्रांमध्ये रात्री-अपरात्री आलेल्या रूग्णांना सर्प आणि विंचूदंश रूग्णांना लस उपलब्ध नसल्याचे सांगत अन्यत्र रूग्णालयात पाठवण्यात येत असल्याचे धक्कादायक प्रकार होत आहेत. याकरिता आरोग्य केंद्रांमध्ये रूग्णालय समितीच्या कामाकाजाचे स्वरूप ठरवून देणे आवश्यक आहे. या रूग्णालयामध्ये राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर असल्याने या समित्यांचे कामकाजही तकलादू झाले आहे. त्यामुळे काही वैद्यकीय अधिकारीही रूग्णालयात उपस्थित नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा रुग्णांची मोठी कुचंबणा होत आहे.


खेडमध्ये भातकापणीच्या हंगामात साप आणि विंचूदंशाचे प्रमाण जास्त असल्याचे मागील काही वर्षात दिसून आले आहे.


आरोग्य केंद्रसंख्या
तळे११५
कोरेगाव४७
फुरूस१५४
आंबवली११९
वावे८९
लोटे२९८
शिव बुद्रुक३८
तिसंगी१२९

लस उपलब्ध होणार का?
खेडमधील प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर विंचू आणि सर्पदंशाची लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. ही लस वेळेत आणि योग्य प्रमाणात कधी उपलब्ध होणार? असा सवाल होत आहे.

Web Title: Panic in snakes, scattered villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.