शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत चोरट्यांची दहशत, एकाचवेळी फोडले दहा फ्लॅट; नागरिकांवर हल्ल्याचा प्रयत्न

By सुधीर राणे | Updated: September 24, 2022 11:54 IST

चोरीच्या या घटनेमुळे उडाली एकच खळबळ

कणकवली : कणकवली शहरातील मराठा मंडळ रोडवर असलेल्या क्रिस्टल रेसिडेन्सी बिल्डींग मधील तब्बल दहा फ्लॅट चोरट्यांनी एकाच वेळी फोडले. आज, शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. चोरीच्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, फ्लॅट फोडत असताना इतर लोक राहत असलेल्या फ्लॅटच्या दरवाजाना बाहेरून कडी घालून घेत चोरट्यानी सावधगिरी बाळगली.ही बाब काहींच्या लक्षात येतात फ्लॅटमधील काही लोकांनी आरडाओरड केली. यादरम्यान त्यांनी आणि तेथे राहत असलेल्या या बिल्डिंग मधील एका फ्लॅट धारकाने चोरट्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यानी तिथे असलेल्या विटा या नागरिकांवर भिरकावत हल्ला केला. चोरटे पळून जाताना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपल्या हातातील कटावणीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.चोरटे पळून जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक व युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत नागरिकांशी चर्चा केली. तसेच याबाबत पोलिसांना देखील माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. चोरट्यांनी नेमका कितीचा मुद्देमाल लंपास केला याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिस