शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शाळा स्थलांतरणास आमचा विरोधच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 17:50 IST

Kankavli School Sindhudurg- सदगुरु भालचंद्र महाराज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ३ स्थलांतर व हस्तांतरण करण्यास आमचा तीव्र विरोध आहे,अशी भूमिका कणकवली येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ३ बचाव समितीच्यावतीने नामानंद मोडक , विष्णू राणे , गणपत मालंडकर , संजय मालंडकर यांच्यासह अन्य नागरिकांनी बुधवारी स्पष्ट केली. तसेच हा विरोध तीव्र करण्यासाठी नागरिकांमध्ये सह्याची मोहीम राबवत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले .

ठळक मुद्देशाळा स्थलांतरणास आमचा विरोधच ! कणकवली येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ३ बचाव समितीची भूमिका

कणकवली : सदगुरु भालचंद्र महाराज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ३ स्थलांतर व हस्तांतरण करण्यास आमचा तीव्र विरोध आहे,अशी भूमिका कणकवली येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ३ बचाव समितीच्यावतीने नामानंद मोडक , विष्णू राणे , गणपत मालंडकर , संजय मालंडकर यांच्यासह अन्य नागरिकांनी बुधवारी स्पष्ट केली. तसेच हा विरोध तीव्र करण्यासाठी नागरिकांमध्ये सह्याची मोहीम राबवत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले .

ही जिल्हा परिषदेची चांगली चालणारी शाळा अस्थिर करण्याचा हेतू काय ? जवळच्या हायस्कूलचा प्राथमिक विभाग पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी ही प्राथमिक शाळा अस्थिर केली जात आहे का ? आमचा संस्थानला विरोध नाही मात्र , शाळा तिथेच राहू देत. ती स्थलांतरित करू देणार नाही. तसा प्रयत्न झाल्यास आमचा विरोध कायम राहील, अशी भूमिका कणकवली येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ३ बचाव समितीने  स्पष्ट केली.कणकवली कांबळेगल्ली येथील पाटकर कॉम्प्लेक्स येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ३ बचाव समितीचे बाळकृष्ण कांबळे , सायली राणे , दिलीप मालंडकर , गणपत मालंडकर , प्रशांत गवळी , रवि सावंत , अमित मांडवकर , सुरेश राणे , अनिल अणावकर , विवेक पाटकर , सुमित पाटकर , रंजना पाटकर आदी उपस्थित होते .यावेळी नामानंद मोडक म्हणाले, शाळा व्यवस्थापन समितीने इमारत जीर्ण झाल्याबद्दल दुरुस्ती ठराव मांडला का ? तो नसेल तर शाळा स्थलांतरित करण्याची चर्चा तरी का ? शाळा व्यवस्थापन समितीला आजपर्यत कधीही संस्थानने विश्वासात घेतले नाही.तालुक्यातील सर्वात जास्त पटसंख्या असलेली ही शाळा अस्थिर करायची आणि सामान्य कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाच्या सुविधा बंद पाडायच्या , असा हा प्रयत्न आहे.शहरातील अवस्था पाहता आतापर्यंत अनेक शाळा बंद पडल्या आहेत.त्यामुळे चांगले शिक्षण देणाऱ्या या शाळेच्या बाबतीत घडणारा हा सर्व प्रकार म्हणजे शाळा बंद कराण्याचा घाट आहे.त्याला आमचा विरोध आहे.संजय मालंडकर म्हणाले, भालचंद्र महाराज भक्त निवास बांधायचे असेल तर ते शाळेच्या पुढिल जागेत बांधावे. तसेच आमदार , खासदार निधी देत असतील , तर सध्या असलेली शाळाच दुरुस्त करावी.आम्ही त्याला समर्थन देवू . शाळा व्यवस्थापन समितीला गेल्या ४ वर्षात एकदाही विश्वासात न घेता हा निर्णय घेतला जात आहे.कोणत्याही प्रकारची चर्चा समितीबरोबर केलेली नाही.या शाळेला कोणीच वाली नाही अशी भावना भालचंद्र महाराज संस्थानची झाली असल्याचा आरोप यावेळी बचाव समितीने केला .दरम्यान, ही शाळा आहे , तिथेच राहावी अशी आमची भूमिका आहे.ही जागा शाळेसाठी मारुती हरी आचरेकर यांनी दिली . ती व्यक्ती मोलमजुरी करणारी होती.शाळेसाठीच ही जागा वापरावी म्हणून त्यांनी जागा दिली होती.मग ती जमीन इतर कामासाठी कशी देणार ? असे मतही यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले .

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रKankavliकणकवलीSchoolशाळाsindhudurgसिंधुदुर्ग