शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

उंबडेर्तील शुटींगबॉल स्पर्धेत पंजाब खली विजेता, ग्रामसेवा क्रीडा मंडळातर्फे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 12:06 IST

गरगरत्या चेंडूवरच्या भिरभिरत्या नजरा अन खचाखच भरलेल्या मैदानावरील क्रीडा रसिकांच्या जोशपूर्ण वातावरणात पंजाब खली संघाने उंबर्डेतील राष्ट्रीय शुटींगबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तर आयएससी मालेगाव संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेत महाराष्ट्रातील नामवंत संघासह राज्याबाहेरील चार संघ सहभागी झाले होते.

ठळक मुद्देउंबडेर्तील शुटींगबॉल स्पर्धेत पंजाब खली विजेता, ग्रामसेवा क्रीडा मंडळातर्फे आयोजन क्रीडा प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद; राज्याबाहेरील संघ होते सहभागी

वैभववाडी: गरगरत्या चेंडूवरच्या भिरभिरत्या नजरा अन खचाखच भरलेल्या मैदानावरील क्रीडा रसिकांच्या जोशपूर्ण वातावरणात पंजाब खली संघाने उंबर्डेतील राष्ट्रीय शुटींगबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तर आयएससी मालेगाव संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेत महाराष्ट्रातील नामवंत संघासह राज्याबाहेरील चार संघ सहभागी झाले होते.उंबर्डे ग्रामसेवा क्रीडा मंडळाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे राष्ट्रीय शुटींगबॉल स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. यावर्षी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मैदानावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते झाले. उद्घाटन सोहळ्याला स्वाभिमान पक्षाचे जिल्हा प्रवक्तेो भालचंद्र साठे, तालुकाध्यक्ष अरविंद रावराणे, नासीर काझी, हर्षदा हरयाण, हुसेन लांजेकर, बाळा हरयाण, प्राची तावडे, शुभांगी पवार, आएशा लांजेकर, द. गो. मुद्रस, एस. पी. परब, डॉ. विजय पांचाळ, जगदीश मोपेरकर आदी उपस्थित होते.जिल्हा परिषद अध्यक्षा सावंत यांनी ग्रामसेवा क्रीडा मंडळातर्फे आयोजित केल्या जाणा-या राष्ट्रीय शुटींगबॉल स्पर्धेचे कौतुक करताना ही स्पर्धा जिल्ह्याचे वैभव असल्याचे उद्गार काढले.

या स्पर्धेतून उत्तम राष्ट्रीय खेळाडू तयार होऊन देशात आपल्या जिल्ह्याचे नाव करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी, भालचंद्र साठे, रावराणे मंडळाचे संस्थापक मौलाना महंमदअली मौलवी यांनी मार्गदर्शन केले.ग्रामसेवा क्रीडा मंडळाचे अध्यक्ष तथा सरपंच एस.एम.बोबडे यांनी प्रास्ताविकात मंडळाच्या उपक्रमांची माहिती देत देणगीदार व हितचिंतकांचे ऋणी असल्याचे सांगितले. तसेच मंडळाच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्षा सावंत याचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन विजय केळकर यांनी केले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अड महेश रावराणे, उत्तम सुतार, राजू रावराणे, संजय महाडिक, सुजन दळवी, खुदबुद्दीन रमदूल, सचिन दळवी, किशोर दळवी, रफिक बोबडे, आस्लम पाटणकर, अनिल पाटील, उमर रमदूल, सदानंद दळवी, शहाबुद्दीन नाचरे, आलिबा बोथरे, रजा स्पोर्टस् क्लब, नितीन महाडिक, विजय दळवी, रत्नकांत बंदरकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.पंजाब खली' ने आयएससी मालेगाव'ला नमविलेअटीतटीच्या अंतीम सामन्यात पंजाब खली संघाने आयएससी मालेगाव संघावर मात करुन २५ हजाराचे प्रथम पारितोषिक व चषक पटकावला. तर उपविजेत्या आयएससी मालेगाव संघाला २० हजार रुपये व चषक, तृतीय-कडेपूर-सांगली(१५००० व चषक), चतुर्थ- एस.बी.एम, माळशिरस(सोलापूर-१००००)

पाच ते आठ क्रमांकाच्या धरणमुक्ती कोल्हापूर, खुर्शिद मालेगाव, इस्तियाक मालेगाव आणि अनिस मालेगाव या संघाना प्रत्येकी ३००० उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. याशिवाय उत्कृष्ट शूटर, उत्कृष्ट संघ व उत्कृष्ट नेटमन अशी वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात आली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग