मोदी सरकारला बदनाम करण्यासाठीच विरोधकांची आंदोलने :विनोद तावडे यांचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 10:20 AM2021-02-27T10:20:07+5:302021-02-27T10:25:08+5:30

Vinod Tawde Sindhudurg-देशात आता होत असलेली आंदोलने ही फक्त मोदी सरकारला बदनाम करण्यासाठीच असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय सचिव,माजी मंत्री विनोद तावडे यांनी केला.

Opposition's agitations only to discredit Modi government: Vinod Tawde's allegation | मोदी सरकारला बदनाम करण्यासाठीच विरोधकांची आंदोलने :विनोद तावडे यांचा आरोप 

मोदी सरकारला बदनाम करण्यासाठीच विरोधकांची आंदोलने :विनोद तावडे यांचा आरोप 

googlenewsNext
ठळक मुद्देमोदी सरकारला बदनाम करण्यासाठीच विरोधकांची आंदोलने :विनोद तावडे यांचा आरोप  आंदोलनजीवी लोक विविध मुद्द्यावर आंदोलने घडवतात

कणकवली: गेल्या काही वर्षात केंद्र सरकारने महत्वाचे निर्णय घेतले. त्यात जीएसटी, एपीएमसी यांचा समावेश आहे. हे सगळे विषय काँग्रेसला करायचे होते.त्यांना हे निर्णय घेता आले नाहीत.पण कणखर मोदी सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत.मात्र, आता काँग्रेस व इतर विरोधी पक्ष त्यालाच विरोध करीत आहेत.देशात आता होत असलेली आंदोलने ही फक्त मोदी सरकारला बदनाम करण्यासाठीच असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय सचिव,माजी मंत्री विनोद तावडे यांनी केला.

कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत आहे.यावेळी बँक संचालक अतुल काळसेकर, सरचिटणीस प्रमोद रावराणे, सभापती मनोज रावराणे, संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, बबलू सावंत,मेघा गांगण,पूजा कर्पे, संतोष पूजारे,समर्थ राणे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

विनोद तावडे म्हणाले, कृषी कायद्याला विरोध करणाऱ्यांपैकी पंजाब व छत्तीसगडमधील कॉग्रेस सरकारने अदानी बरोबर त्यांच्या राज्यात करार केले आहेत .देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव एका मैदान दिले. तर त्याबद्दल विरोधकांनी टीका सुरू केली.पण देशात २७ हून अधिक मैदानाना राजीव गांधी,इंदिरा गांधी,जवाहरलाल नेहरु यांचे नाव आहे. त्याबद्दल काँग्रेसवाले काहीच बोलत नाहीत. असा टोला विनोद तावडे यांनी यावेळी लगावला.

देशात महात्मा गांधी,जयप्रकाश नारायण,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक आंदोलने केली. त्यांच्या आंदोलनात केव्हाच हिंसा नव्हती.आता आंदोलने होतात,तेच तेच लोक आंदोलनात दिसतात. एकत्रितपणे ठरवून आंदोलने करतात.त्यांना आंदोलनजीवी लोक असे नाव ठेवले आहे . दिल्ली येथे रस्त्यावर बसून आंदोलकांनी जनजीवन विस्कळीत केले .त्यांना मैदानात आंदोलन करता आले असते. पण तसे झाले नाही.

त्या आंदोलकांवर भाजपचे सरकार काही अन्याय करतेय का ?यासाठीही काहीजण प्रयत्न करीत आहेत. आंदोलन भडकविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण त्यांना ते शक्य झालेले नाही.
मोदी सरकार गेली ७ वर्षे आहे. त्यात एक तरी भ्रष्टाचारी व्यक्ती दाखवावी . तेही करता येत नाही . त्यामुळे एक प्रकारे विरोधाला फक्त विरोध करण्याचे धोरण काँग्रेसने अवलंबिले आहे. असेही विनोद तावडे यावेळी म्हणाले.
 

 

 

Web Title: Opposition's agitations only to discredit Modi government: Vinod Tawde's allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.