कोकणात इतिहास घडविण्याची संधी द्या  :राजन तेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 04:59 PM2019-10-10T16:59:24+5:302019-10-10T17:00:53+5:30

मला जिल्ह्यातील सर्व पदे परमेश्वराच्या कृपेने मिळाली. लोकांच्या न्याय हक्कासाठी मी लढलो. आमच्यावर खटले दाखल झाले तरी आम्ही थांबलो नाही. एवढी वर्षे संधी देऊन पालकमंत्री निष्क्रिय ठरले. आता बदल झाला पाहिजे. यामुळे कोकणात नवीन इतिहास घडविण्यासाठी मला काम करण्याची संधी द्या, असे आवाहन राजन तेली यांनी पेंडूर येथे केले.

Opportunity to make history in Konkan: Rajan Teli | कोकणात इतिहास घडविण्याची संधी द्या  :राजन तेली

कोकणात इतिहास घडविण्याची संधी द्या  :राजन तेली

Next
ठळक मुद्देपेंडूर येथून गावभेट दौऱ्याला प्रारंभमातोंड, पाल, तुळस, होडावडा, वजराठ येथील कार्यकर्त्यांशी संवाद

वेंगुर्ला : मला जिल्ह्यातील सर्व पदे परमेश्वराच्या कृपेने मिळाली. लोकांच्या न्याय हक्कासाठी मी लढलो. आमच्यावर खटले दाखल झाले तरी आम्ही थांबलो नाही. एवढी वर्षे संधी देऊन पालकमंत्री निष्क्रिय ठरले. आता बदल झाला पाहिजे. यामुळे कोकणात नवीन इतिहास घडविण्यासाठी मला काम करण्याची संधी द्या, असे आवाहन राजन तेली यांनी पेंडूर येथे केले.

वेंगुर्ला तालुक्यात भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजन तेली यांच्या गावभेट दौऱ्याला पेंडूर येथे श्री देव घोडेमुख चरणी श्रीफळ अर्पण करून सुरुवात झाली. त्यानंतर तेली यांनी मातोंड श्री देवी सातेरी, पाल येथील श्री देवी खाजणादेवी, तुळस श्री देव जैतीर, होडावडा क्षेत्रपालेश्वर, वजराठ येथील देवतांचे दर्शन घेऊन भाजप व स्वाभिमानाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

पेंडूर येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राजन तेली म्हणाले की, घोडेमुखाच्या कृपेने जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून पहिली लाल दिव्याची गाडी मिळाली. त्यामुळे आमदार झाल्यावर सर्वप्रथम घोडेमुख चरणी येणार आहे. निवडणूक जवळ आली की फक्त घोषणा होतात. युवक समोर बघितले की केसरकर यांना सेटअप बॉक्स प्रकल्प आठवतो. पूरस्थितीत लोक टीका करतील म्हणूनच केवळ पालकमंत्री तुम्हांला फिरताना दिसले. माझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे.

यावेळी भाजपा तालुकाप्रमुख बाळू देसाई, तुळस सरपंच शंकर घारे, पेंडूर माजी सरपंच संतोष गावडे, ज्येष्ठ कार्यकर्ते नाना गावडे, स्वाभिमानचे युवा कार्यकर्ते कमलेश गावडे, संतोष शेटकर, सामजिक कार्यकर्ते काका परब, रमाकांत परब, माजी सरपंच उदय परब, स्वाभिमानचे पदाधिकारी ज्ञानेश्वर केळजी, किशोर परब, भाजपा पदाधिकारी दादा वाटवे, सोमा मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य सीताराम जाधव, पाल सरपंच श्रीकांत मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्या संध्या गावडे, भाजपचे प्रदीप दळवी, स्वाभिमानचे नितीन चव्हाण यांच्यासह भाजप व स्वाभिमान पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Opportunity to make history in Konkan: Rajan Teli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.