शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी यांत्रिकीकरणाचे फक्त ११२ प्रस्ताव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 10:29 IST

Kankavli panchayat samiti sindhudurg -कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत कोरोनामुळे मागील वर्षी सोडत काढण्यात अडचणी आल्या. मात्र, आयुक्‍त स्तरावर झालेल्या ऑनलाईन सोडतीमध्ये यातील केवळ ११२ प्रस्तावांची निवड करण्यात आल्याने पंचायत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली.

ठळक मुद्दे कणकवली पंचायत समिती सभेत माहिती उघड कृषी विभागाच्या प्रश्‍नांवर स्वतंत्र बैठक : मनोज रावराणे

कणकवली: कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत मागील वर्षी कणकवली तालुक्यातून विविध औजारांसाठी सुमारे १२९० प्रस्ताव प्राप्त झाले होते. कोरोनामुळे मागील वर्षी सोडत काढण्यात अडचणी आल्या. मात्र, आयुक्‍त स्तरावर झालेल्या ऑनलाईन सोडतीमध्ये यातील केवळ ११२ प्रस्तावांची निवड करण्यात आल्याने पंचायत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली. तसेच उर्वरित प्रस्ताव नाकारताना देण्यात आलेल्या कारणांची माहिती आम्हाला द्या. अशी मागणी केली.कणकवली पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा प.पू. भालचंद्र महाराज सभागृहात सभापती मनोज रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती प्रकाश पारकर, गटविकास अधिकारी अरूण चव्हाण आदी उपस्थित होते.या सभेत कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत किती प्रस्ताव मंजूर झाले? अशी विचारणा सदस्य मिलिंद मेस्त्री यांनी केली असता, १२९०प्रस्तावांपैकी ११२ लाभार्थ्यांची निवड झाल्याचे कृषी अधिकार्‍यांनी सांगितले. मग उर्वरित प्रस्तावांचे काय करणार? अशी विचारणा सदस्य गणेश तांबे यांनी केली.भातपिक विमा योजनेचा किती शेतकर्‍यांना फायदा झाला आहे? अशी विचारणा सदस्य मंगेश सावंत यांनी केली. अवकाळी पावसामुळे झालेल्या आंबा, काजू बागायतींच्या नुकसानीचे काय? अशी विचारणा केल्यानंतर कृषी विभागाशी संबंधित असलेल्या सर्वच प्रश्‍नांवर स्वतंत्र बैठक घेऊन त्याचा निपटारा केला जाईल असे सभापती मनोज रावराणे यांनी सांगितले.पंचायत समिती सेसमधून शेतकर्‍यांना ताडपत्री वितरित केल्या जाणार असून त्यांचे प्रस्ताव लवकरात लवकर पाठवावेत. असे गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांनी यावेळी सांगितले. कोविड लसीकरणाचा आढावा घेताना तालुक्यात १८९९ लाभार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १७०० जणांना कोविड लसीकरण झाले असून हे प्रमाण ९० टक्के इतके आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.तालुक्याचा पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये नळयोजना विशेष दुरूस्तीची १८ कामे, तात्पुरती पुरक नळयोजनेची २ कामे, नवीन विंधन विहिरी ६३, विहिर खोल करणे व गाळ काढणे २१ कामे अशा १०४ कामांसाठी १ कोटी ११ लाख ८७ हजाराचा प्रस्तावित आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.कणकवली तालुक्याचा विकास करताना लोकप्रतिनिधींबरोबरच अधिकारीही सहभागी व्हायला हवेत. त्यामुळे येत्या काळात सर्वांनी एकत्रितपणे काम करत तालुक्याच्या विकासाला गती द्यावी असे आवाहन उपसभापती प्रकाश पारकर यांनी केले.

कार्यकारिणीचा कार्यकाळ एक वर्षे शिल्लक असून या काळात प्रलंबित सर्व प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी लवकरच स्वतंत्र बैठक आयोजित केली जाईल असे मनोज रावराणे यांनी सांगितले. सभेत कणकवली तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.फक्त ४७ शेतकऱ्यांनाच मोबदलाभातपीक विमा योजनेमध्ये ३१३पैकी फक्त ४७ शेतकर्‍यांना मोबदला देण्यात आल्याने इतरांचे काय ? अशी विचारणा या सभेत सदस्यांमधून करण्यात आली. यावेळी कृषी विभागा अंतर्गत विविध प्रलंबित प्रश्‍नांवर स्वतंत्र बैठक घेण्याचे आदेश सभापती मनोज रावराणे यांनी दिले.

टॅग्स :Kankavliकणकवलीpanchayat samitiपंचायत समितीsindhudurgसिंधुदुर्ग