कणकवली : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली तीन अज्ञात मोबाईधारक व्यक्तीनी एका फायनान्सिअल कंपनीचे नाव वापरून विष्णू वामन चौधरी (४८, मुळ रा. लालबाग, मुंबई, सध्या रा. भिरवंडे नरामवाडी,ता.कणकवली) यांची ७ लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत विष्णू चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आपण मुंबईत रहात असून सध्या कणकवली तालुक्यातील भिरवंडे येथील मित्र नीलेश सावंत यांच्यासोबत शेळी पालन व्यवसाय करतो. त्यांची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक आहे. त्यांच्या मोबाईलवर व्हॉटसअॅपवर एका नंबरवरून एआरएफएस-६२० सिक्युरिटीझ ऑफिशियल स्टॉक अशी लिंक आली. त्या ग्रुपला ते जॉईन झाले. त्यांनी शेअर्स खरेदीसाठी अनामिका ट्रेडर्स यांच्या बँक खात्यात वेळोवेळी पैसे जमा केले. ४४ लाख २७ हजार ८०२ रुपये जमा रक्कमेतून १२ लाख व त्यावरील व्याज वजा करून उर्वरित रक्कम द्या अशी विनंती केली असता ती रक्कम मिळाली नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी विष्णू चौधरी यांनी सायबर क्राईम कार्यालयामध्ये ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची सात लाखाची फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल
By सुधीर राणे | Updated: December 21, 2024 12:44 IST