शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीत गोमांस विक्रीच्या संशयावरून एकजण ताब्यात

By admin | Updated: July 12, 2015 00:37 IST

नागरीक संतप्त : सहा तास पोलीस ठाण्यात ठिय्या

सावंतवाडी : सावंतवाडीत दोन दुचाकींमध्ये अपघात झाला. या अपघातावेळी नझीर अहमद महमद जमादार (वय ५६, रा. बाहेरचावाडा, सावंतवाडी) याच्याकडे गोमांस असल्याचा संशय स्थानिक नागरिकांना आला. यामुळे खळबळ उडून नागरिकांनी संबंधिताच्या अटकेसाठी तब्बल सहा तास पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई सुरू केली होती. शनिवारी सकाळी नऊ वाजता नीतेश गणेश रेडकर (रा. कवठणी, सावंतवाडी) याच्या ताब्यातील करिझ्मा दुचाकी आणि नझीर अहमद महमद जमादार चालवीत असलेल्या टीव्हीएस दुचाकीत कंटक पाणंद येथे अपघात झाला. त्यात जमादार रस्त्यावर दुचाकीसह कोसळला. त्यावेळी त्याच्याकडे असलेल्या पिशवीत मांस असल्याचे दिसून आले. नागरिकांनी तातडीने याबाबत पोलिसांना कळविले. पोलीस कॉन्स्टेबल पी. आर. माने घटनास्थळी आले; पण त्यांनी काहीच घडले नसल्याचा आव आणला. त्यामुळे संतप्त नागरिकांनीच ते मांस पोलीस ठाण्यात आणले. पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांची भेट घेऊन याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली. सुरुवातीला पोलिसांनी त्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नागरिकांच्या दबावानंतर पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांनी वनविभागाचे अधिकारी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी ई. बुकतारे यांना बोलावून मांसाची प्राथमिक तपासणी करून घेतली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथमदर्शनी आपला अहवाल पोलिसांना दिला. पोलीस तसेच खासगी पंचासमोर हे मांस पिशवीत बंद करण्यात आले असून, ते आज, रविवारी पुणे येथे पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, पोलिसांनी नझीर अहमद महमद जमादार याच्यावर महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा १९९५ चे सुधारित कलम ५(६) प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. सायंकाळी उशिरापर्यंत जमादार याच्यावर अटकेची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. जमादार याच्याकडे गोमांसच असून, मांस विक्रीची कोणतीही परवानगी नाही. हॉटेल तसेच अन्य कोणतेही उद्योग नाहीत, अशी तक्रार सुनील पेडणेकर यांनी दिल्यानंतर अवैधरीत्या गोमांस विक्रीचा गुन्हा दाखल करण्यात आला, तर अपघाताची तक्रार नीतेश रेडकर याने दिली. पोलिसांच्या पवित्र्याने सर्वपक्षीयांचा ठिय्या हा प्रकार बाहेर येताच पोलिसांनी ते गोमांस नाहीच, असा पवित्रा घेतल्याने सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात तब्बल सहा तास ठिय्या आंदोलन केले. यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. अखेर नझीर जमादार याच्यावर गुन्हा दाखल करीत त्याला ताब्यात घेण्याचे आश्वासन देताच आंदोलनकर्ते शांत झाले. शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब, सभापती प्रमोद सावंत, चंद्रकांत कासार, माजगाव सरपंच आबा सावंत, महेश पांचाळ, शहर अध्यक्ष मंदार नार्वेकर, शिवसेना शहरप्रमुख शब्बीर मणियार, संदीप सुकी, गौरांग रेगे, सतीश नार्वेकर, चेतन आजगावकर, सत्यवान बांदेकर, दिलीप भालेकर, आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते जमा झाले होते. मीच मटन दिले : शारबिद्रे आंदोलनकर्ते आक्रमक झाले असतानाच सावंतवाडीतील मटन व्यापारी विवेक शारबिद्रे पोलीस ठाण्यात आला आणि त्याने मीच जमादार याला मटन दिले, असे सांगितले. माझ्याकडून चार किलो मटन नेले, असे पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांना त्याने सांगताच पोलिसांनी त्याच्याकडून रीतसर जबाब नोंदवून घेतला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी उलट-सुलट सवाल केले; पण शारबिद्रे आपल्या म्हणण्यावर ठाम राहिला. (प्रतिनिधी)