काळसेतील एकाची गळफास घेवून आत्महत्या

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 31, 2023 18:06 IST2023-05-31T18:05:37+5:302023-05-31T18:06:25+5:30

चौके ( सिंधुदुर्ग ) : मालवण तालुक्यातील काळसे सुतारवाडी येथील वामन रामचंद्र पाटील उर्फ बाबल पाटील (४५ ) याने ...

One of the committed suicide by hanging himself in Kalase | काळसेतील एकाची गळफास घेवून आत्महत्या

काळसेतील एकाची गळफास घेवून आत्महत्या

चौके (सिंधुदुर्ग) : मालवण तालुक्यातील काळसे सुतारवाडी येथील वामन रामचंद्र पाटील उर्फ बाबल पाटील (४५ ) याने बुधवारी, ३१ मे रोजी पहाटे आपल्या राहत्या घरातील पडवीच्या वाश्याला टॉवेलच्या सहायाने गळफास लावून आत्महत्या केली.

घरातील व्यक्तींच्या सकाळी ही बाब निदर्शनास येताच पोलिस पाटील विनायक प्रभू यांच्याशी संपर्क केला आणि घटनेची माहिती दिली. त्यानंतर कट्टा पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस हवालदार पी. जी. मोरे आणि पोलिस शिपाई सिद्धेश चिपकर यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. वामन याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मालवण येथे नेण्यात आला. दुपारनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर वामन यांच्या पार्थिवावर काळसे येथे अंत्यविधी करण्यात आले.

कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास असलेला वामन पाटील हा काही दिवसांपूर्वी काळसे येथील आपल्या घरी आला होता. मृत वामन उर्फ बाबल पाटील याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट झाले नसून कट्टा दूरक्षेत्राचे पोलिस पी. जी. मोरे आणि सिद्धेश चिपकर अधिक तपास करीत आहेत.

Web Title: One of the committed suicide by hanging himself in Kalase