पाणमांजराला लावलेल्या तारेचा शॉक लागून एकाचा मृत्यू

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: October 12, 2022 16:35 IST2022-10-12T16:35:20+5:302022-10-12T16:35:38+5:30

वेंगुर्ला : पाणमांजराला लावलेल्या विजेचा तारेचा शॉक लागून वेंगुर्ला येथील कोरचे आगारवाडी येथे एकाचा जागीच मृत्यू झाला. लोकनाथ चित्तरंजन ...

One died after being shocked by a water cat | पाणमांजराला लावलेल्या तारेचा शॉक लागून एकाचा मृत्यू

पाणमांजराला लावलेल्या तारेचा शॉक लागून एकाचा मृत्यू

वेंगुर्ला : पाणमांजराला लावलेल्या विजेचा तारेचा शॉक लागून वेंगुर्ला येथील कोरचे आगारवाडी येथे एकाचा जागीच मृत्यू झाला. लोकनाथ चित्तरंजन सरकार ऊर्फ छोटू (वय २४) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद निवती पोलीस ठाण्यात झाली आहे.

लोकनाथ हा मूळचा पश्चिम बंगाल येथील राहणारा आहे. छोटू यास कोळंबी प्रकल्पाच्या बांधावरील पाय वाटेवर पाणमांजर करीता लावलेल्या विजेच्या तारांचा जोरदार शॉक लागला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. आत्माराम भिवा दळवी (रा. होडावडे पटेलवाडी ता.वेंगुर्ला) यांनी याप्रकरणी निवती पोलीस ठाण्यामध्ये माहिती दिली. याबाबतचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पगडे करीत आहेत.

 

Web Title: One died after being shocked by a water cat