शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

गोळीबार प्रकरणातील आरोपीला ४ दिवसांची कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 1:49 PM

कणकवली तालुक्यातील जानवली- फणसुली जंगलात गुराखी अभिषेक राणे याने संशयित आरोपी रविकांत उर्फ बाबू गणपत राणे (५०, रा. जानवली, गणपतीवाडी) याला रानटी डुक्कर आल्याचे कळविले़ त्यानुसार राणे याने आपल्यासमवेत सखाराम मेस्त्रीसह अन्य तिघांना घेऊन जंगलात धाव घेतली़.

ठळक मुद्देडुकरावर साधला निशाणा अन् होत्याचे नव्हते झाले काडतुसची बंदूक पोलिसांनी घेतली ताब्यात

कणकवली : तालुक्यातील जानवली- फणसुली जंगलात गुराखी अभिषेक राणे याने संशयित आरोपी रविकांत उर्फ बाबू गणपत राणे (५०, रा. जानवली, गणपतीवाडी) याला रानटी डुक्कर आल्याचे कळविले़ त्यानुसार राणे याने आपल्यासमवेत सखाराम मेस्त्रीसह अन्य तिघांना घेऊन जंगलात धाव घेतली़.

१६ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास रानडुकराला मारण्यासाठी फणसुली जंगलात काडतुसच्या बंदुकीने निशाणा धरला. मात्र, तो निशाणा चुकून ती गोळी सखाराम महादेव मेस्त्री (४८, रा़ जानवली गावठणवाडी) यांच्या उजव्या कानावरती डोक्याला लागली. त्यात सखाराम मेस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे आरोपीला अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्याला २० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी शवविच्छेदनाचा अहवाल जिल्हा रुग्णालयातून करून घेतला. या प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी नामांकित मोरे, तपासी अधिकारी जंबाजी भोसले यांच्या पथकाने शनिवारी घटनास्थळी जानवली फणसुली जंगलात तपास केला. तसेच गुन्ह्यातील डबल बॅरलची बंदूक पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. आरोपी रविकांत राणे याच्याविरोधात विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुतण्याने दिली कायदेशीर कारवाईसाठी तक्रारजानवलीतील मेस्त्री मृत्यू प्रकरणात पुतण्या मनोज मंगेश मेस्त्री (३०, रा़ जानवली, गावठणवाडी) याने पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे की, आपण स्वप्नील राणे यांच्या घरी गणपती बनविण्यासाठी १६ आॅगस्ट रोजी सकाळी गेलो होतो. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घरी परत आलो असता गावातील लोक गोळा झाले होते. त्यावेळी काही जाणकारांनी माझ्या काकाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानुसार आम्ही फणसुली जंगलात गेलो असता काका उताण्या अवस्थेत पडलेले आढळून आले. त्यांच्या उजव्या कानाच्यावरती डोक्यावर जखम झाली होती़.

अधिक माहिती घेतल्यावर रानडुकराला मारण्यासाठी जाऊया असे काकाला रविकांत राणे यांनी सांगितल्याचे कळले. त्यांच्यासमवेत अक्षय राणे, अनिकेत राणे, रंजत राणे असे मिळून एकूण पाच जण होते.

रानटी डुकराला मारण्याच्या उद्देशाने मारलेली गोळी लागून सोबतच्या लोकांना मृत्यू येऊ शकतो याची जाणीव असतानाही रविकांत राणे याने गोळी झाडली. ती गोळी माझ्या काकाला लागल्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे गोळी झाडणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग