केळीच्या बागांची नासाडी करून ‘ओंकार’ हत्ती गेला गोवा हद्दीत; पाहण्यासाठी वाहनांच्या रांगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 08:40 IST2025-09-17T08:37:38+5:302025-09-17T08:40:12+5:30
बांदा (जि.सिंधुदुर्ग) : नेतर्डे परिसरात गेले चार दिवस धुमाकूळ घालत असलेल्या ‘ओंकार’ हत्तीने सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील पत्रादेवी ...

केळीच्या बागांची नासाडी करून ‘ओंकार’ हत्ती गेला गोवा हद्दीत; पाहण्यासाठी वाहनांच्या रांगा
बांदा (जि.सिंधुदुर्ग) : नेतर्डे परिसरात गेले चार दिवस धुमाकूळ घालत असलेल्या ‘ओंकार’ हत्तीने सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील पत्रादेवी येथील सीमा तपासणी नाक्यानजीक हजेरी लावली. त्यामुळे गोवा महामार्गावर व परिसरात एकच गोंधळ उडाला. तत्पूर्वी, रात्री हत्तीने फकीरफाटा येथील मराठी शाळेच्या आवारात बस्तान मांडत तेथील केळी बागायतीची मोठी नासधूस केली.
बघ्यांवर नियंत्रण ठेवताना नाकीनऊ
रात्री हत्तीला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने वनविभागाच्या पथकाला गर्दीवर नियंत्रण मिळविताना नाकीनऊ आले. मंगळवारी दुपारी ओंकार हत्ती-तोरशे पेट्रोलपंप गोवा हद्दीत असल्याचे वनखात्याकडून सांगण्यात आले.
शाळेच्या आवारात तब्बल दोन तास होता वावर
सोमवारी दिवसभर ओंकारचा वावर नेतर्डे डोंगरपाल डिंगणे परिसरात होता. रात्री तो येथील गोवा फकीरफाटा शाळेच्या आवारात दाखल झाला. तब्बल दोन तास त्याचा याठिकाणी वावर होता.
त्याला पाहण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. बांदा-डिंगणे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मध्यरात्री त्याने मुंबई-गोवा महामार्ग गाठत पत्रादेवी तपासणी नाका पार केला.